समकालीन राजकारण : आंबेडकरी आकलन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 10 May 2022

समकालीन राजकारण : आंबेडकरी आकलन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

मुंबई :

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रबुद्ध भारताचे मुख्य संपादक  अॅड.  प्रकाश आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत पाक्षिकात लिहिलेल्या अग्रलेखांचे संपादित पुस्तक  समकालीन राजकारण : आंबेडकरी आकलन

 हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनी  २०१७ पासून लिहिलेल्या अग्रलेखांच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि चौफेर विषयांवर केलेले लेखन या पुस्तकात संपादित केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसच्यावतीने करण्यात आले.


प्रबुद्ध भारताच्या 5व्या वर्धापन दिना निमित्ताने या पुस्तकाचे प्रकाशन अनेक मान्यवरांच्या हस्ते १० मे रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुख्य सभागृहात संपन्न झाले. 


पुस्तक प्रकाशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  अॅड. प्रकाश आंबेडकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप मंडल, हिंदी सिने दिग्दर्शक नीरज घायवान, ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, आमदार कपिल पाटील, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारी अध्यक्ष भीमराव आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर,  वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, भारिप बहुजन महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पुस्तकं प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसचालन शमीमा पाटील यांनी केलं तर प्रस्तावना जितरत्न पटाईत यांनी केलं तर आभार प्रदर्शन वैभव खेळकर यांनी केले..

No comments:

Post a Comment

Pages