राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना अंतर्गत कोठारी(सी) येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 27 May 2022

राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना अंतर्गत कोठारी(सी) येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन


 किनवट,ता.२७(बातमीदार): विदर्भ आणि  मराठवाड्यातील कापूस व सोयाबीन लागवडीचे प्रमाण लक्षणीय आहे. येथील सर्व शेतकऱ्यांना त्यांची उत्पादकता प्रगतीशील शेतकऱ्याच्या बरोबरीने आणण्यासाठी आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना येत्या तीन वर्षांमध्ये राबवण्यात येणार आहे. सदरील योजनेअंतर्गत कापूस व सोयाबीन पिकाखालील क्षेत्र व उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास हे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. तालुका कृषी अधिकारी किनवट  बालाजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेसंबंधी मंडळ कृषी अधिकारी बुद्धभूषण मुनेश्वर यांनी शेतकऱ्यांना सविस्तर असे मार्गदर्शन नुकतेच केले. एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजना ही समूह आधारित संकल्प ने नुसार राबवायची आहे. १०० हेक्टर कापूस क्षेत्र असणाऱ्या १०० वा अधिक शेतकऱ्याच्या मिळून एक समूह तयार करायचा आहे.सदर समूह  निर्माण झाल्यानंतर त्यांच्या क्षेत्रावर उत्पादकता वाढ प्रात्यक्षिके घेऊन प्रात्यक्षिकाद्वारे तसेच त्यांना प्रशिक्षण व शेतीशाळा, प्रक्षेत्र भेट इत्यादी माध्यमातून समूहातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत.

एक समूह एक वाण या संकल्पनेवर आधारित एकजिंसी व स्वच्छ कापूस तयार करून त्यावर प्रक्रिया करुन रुई व सरकी वेगळी करून सूत गिरणी ला कापूस, तर रुई तेल कंपनी यांना दिला तर शेतकऱ्यांना निश्चितच चांगला भाव मिळण्यास मदत होईल. यातून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधता येणार आहे. सुतगिरणी ला आवश्यक एजन्सी व एकत्रित मोठ्या प्रमाणात कापूस उपलब्ध करून देता येईल. यातून सूत गिरण्याना ही कच्चामाल मुबलक प्रमाणात मिळून त्यांनाही सजगता उपलब्ध होणार आहे. म्हणून अशा कापूस उत्पादक समूहासाठी व कापूस पिकासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणे, त्यांचे बळकटीकरण करणे, कापूस साठवणुकीसाठी शेडची निर्मिती करणे, जिनिंग प्रेसिंग युनिट व  ऑइल एक्सट्रॅक्टर यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच प्रोत्साहनपर अनुदान ही दिले जाणार आहे,असे मुनेश्वर यांनी यावेळी बोलताना सांगितले. या योजनेत सहभागी होण्यासाठी गावच्या ग्राम कृषीविकास समितीच्या मान्यतेने लाभार्थ्याची निवड होणार आहे, शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावे ७/१२, अ ८ उतारा,आधार  असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे कापूस पिका खालील क्षेत्र किमान १ एकर असणे बंधनकारक आहे. निवड झालेल्या गावातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले. बीजप्रक्रिया बाबत कृषि पर्यवेक्षक निलकंठवार शरद यांनी बीजप्रक्रिया का आवश्यक आहे, बीजप्रक्रिया केल्याने उत्पन्नामध्ये कशी वाढ होते, याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. आपल्या शेत जमिनीचे माती परीक्षण एकात्मिक खत व्यवस्थापनासाठी किती आवश्यक आहे, या बाबत माती नमुना काढणे प्रात्यक्षिक कृषी सहाय्यक, कोठारी - एस. डी. शेवाळे यांनी करून दाखवले. याप्रसंगी अनेक गावातील प्रगतिशील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषीमित्र सुनील राठोड, सधन शेतकरी वाडगुरे काका,भांडरवाड यांनी पुढाकार घेतला.


No comments:

Post a Comment

Pages