मराठवाड्यात " बाटु " चे उपकेंद्र तात्काळ सुरु करा - स्वप्निल इंगळे पाटील - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 28 May 2022

मराठवाड्यात " बाटु " चे उपकेंद्र तात्काळ सुरु करा - स्वप्निल इंगळे पाटील

नांदेड:

मराठवाड्यात " बाटु " चे उपकेंद्र तात्काळ सुरु करण्यात यावे  अशी  राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदयस तथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे माजी जिल्हा अध्यक्ष इंजि स्वप्निल इंगळे पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,शिक्षणमंत्री तसेच बाटुचे कुलगुरू यांना निवेदना मार्फत केली आहे .

राज्यातील अकृषक विद्यापीठांशी संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठात ( बाटु ) मध्ये करण्यात आला आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांचा तसेच महाविद्यालयाच्या सोयीसाठी व जलद प्रक्रियेसाठी प्रत्येक विद्यापीठामध्ये " बाटु " चे उपकेंद्र सुरु करण्याचे आदेश शासनाने दिले असून त्याला बराच काळ लोटला आहे.  त्या अनुषंगाने काही विद्यापीठांनी " बाटु " ला भाडेतत्वावर जागा दिली आहे . सध्या औरंगाबाद विभागातील २७ महाविद्यालय  बाटूशी संलग्नीत आहेत . परंतु या महाविद्यालयातील विद्यर्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी नजीकच्या अकृषक विद्यापीठांमध्ये " बाटु " चे उपकेंद्र तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच सोलापूर व नागपूर विद्यापीठांमध्ये " बाटु " चे उपकेंद्र सुद्धा उभारण्यात आले आहेत. मराठवाड्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर व स्वा.रा.ती.म विद्यापीठात "बाटु" ची उपकेंद्र सुरु करण्याच्या प्रक्रियेत स्वतः लक्ष घालून गती द्यावी व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना नाहक सामोरे जाणाऱ्या त्रासाला पूर्णविराम द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे .

यावेळी निवेदनवर मनोज डोईजड , निनाद काळे , नागेश येजगे , विक्रम ठाकूर , अजय कदम , चैतन्य वाघमारे , अभिषेक पावडे , अंकुश शिकरे , सदाशिव पापुलवाड ,समर्थ राऊतराव , अजय हट्टेकर  , निखिल वडजे , अजय जाधव , श्रीकांत मगरआदींच्या स्वाक्षऱ्या होत्या .


                                                                                                    


                                                            

No comments:

Post a Comment

Pages