राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती हर्षोल्हासात साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 1 June 2022

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती हर्षोल्हासात साजरी

किनवट,दि.1(प्रतिनीधी) : महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. एका स्त्रीची प्रचंड इच्छाशक्ती, युद्धनीती, दानशूरवृत्ती ‘पुण्यश्लोक’ या उपाधीस पात्र ठरली. येथील बालाजी बामने मित्रमंडळाच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 297 वी जयंती  मंगळवारी (दि.31) किनवट शहर आणि चिखली फाटा येथे मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली.


        यावेळी माजी.आमदार प्रदीप नाईक, युवा नेते कपिल नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, बाजार समितीचे सभापती अनिल पाटील कर्‍हाळे, माजी नगराध्यक्ष अरुण आळणे ,दिशा समिती अध्यक्ष मारुती सुंकरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.


        प्रथमतः उपस्थित मान्यवरांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांनी आपल्या भाषणातून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.  शोषित, पीडित समाजाच्या न्याय हक्कासाठी हातात तलवार घेऊन लढाई करणार्‍या राजमाता अहिल्यादेवी ह्या प्रथम महीला आहेत. इंग्रजाविरुध्द जाहीर बंड करून सतीप्रथा बंद करण्यात अहिल्याबाईचे मोठे योगदान आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच समाजाने मार्गक्रमण केले तर निश्चितच समाजाचे भवितव्य उज्ज्वल होईल असे मौलिक प्रतिपादन जयंतीचे आयोजक तथा राष्ट्रवादीचे युवा नेते  बालाजी बामने यांनी याप्रसंगी केले.


        या जयंती सोहळ्याला  माजी नगराध्यक्ष के मूर्तीची ,माजी नगराध्यक्ष सुनील पाटील ,माजी उपनगराध्यक्ष अजय चाडावार , ज्येष्ठ नेते करपुडे पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती गजानन कोल्हे ,माजी उपसभापती भाऊराव राठोड, काँग्रेसचे युवा नेते आशिष पाटील , गोर सेना तालुका अध्यक्ष कैलास राठोड , अ‍ॅड.राहुल नाईक , अमीत नाईक, कपिल रेड्डी, बंटी पाटील जोमदे, आशिष केवलसिंग नाईक, अजित खान पठाण, अजित साबळे, शेख अफसर, अश्विन पवार, जयंती उत्सव समिती बालाजी बामणे, आशुतोष ठोंबरे, पप्पू सातपुते ,माधव नरोटे, मनोहर श्रीरामे, शिवम देवकते ,रोहित भगत, रामेश्वर केसाळे, संतोष श्रीरामे मनोहर दबडे,  संतोष अडकिने ,शिवा पवार ,बापूसाहेब पाटील, आशिष शेळके, बळीराम भगत, साई शिंदे, शक्ती शिंदे, राज पांढरे, पांडुरंग खरे, रवी पोले ,सुनील हुबे यांचेसह बहुसंख्येंने नागरीक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages