आंबेडकरवादी संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मूलभूत प्रश्नावर निदर्शने ; लांझी, वाळूज येथील महिलांची लक्षणीय उपस्थिती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 31 May 2022

आंबेडकरवादी संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मूलभूत प्रश्नावर निदर्शने ; लांझी, वाळूज येथील महिलांची लक्षणीय उपस्थिती


औरंगाबाद. दि.३१ आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने आज विविध मूलभूत प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निर्दशने करण्यात आली.

ह्यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला निवेदनात औरंगाबाद विमानतळाला तथागत गौतम बुध्दांचे नाव देण्यात  द्यावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करण्यात येऊ नये, महार हाडूळा व वतनी जमिनी मूळ मालकास परत करण्यात याव्यात,गायरान जमिनीवरील दि .14 एप्रिल 2022 रोजी पर्यंतचे अतिक्रमण कास्तकराच्या नावे करण्यात यावे,मागासवर्गीय भूमिहीन पती - पत्नीच्या नावे 5 एकर शेतजमीन करण्यात यावे, दि .14 एप्रिल 1990 पूर्वीचे नियमाकूल न केलेले सरकारी व गायरान जमिनीवरील अतिक्रमण कास्तकाराच्या नावे करण्यात यावे,कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत मागासवगीर्य भुमिहीनांना लागू असलेली दारिद्र्य रेषेची अट रद्द करण्यात यावी,औरंगाबाद शहरात शासनघोषीत झोपडपट्टी वासीयांना पी . आर . कार्ड देण्यात यावे,पंतप्रधान आवास व रमाई घरकुल योजनेचा निधी शहरी रू .5 लाख व ग्रामीण रू .3 लाख करण्यात यावा, अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी,अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठाणे प्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात यावा,गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी, अट्रोसिटी आरोपीस अटक न करता अटकपूर्व जामीन मिळणेसाठी मदत करणाऱ्या तपासी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, गुन्हा दाखल झाल्यानंतर पिडीताचे खात्यावर तात्काळ अनुदान जमा करण्यात यावे,अॅट्रॉसिटी दाखल गुन्ह्याबाबत दरमहा आढावा बैठक घेण्यात यावी ,मागासवर्गीयांचे विविध मंडळामार्फत देण्यात आलेले थकबाकी कर्ज विनाअट माफ करण्यात यावे,शासकीय कर्ज योजने अंतर्गत दिलेल्या उद्दिष्टांप्रमाणे कर्जवाटप करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापक विरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा,महागाई निर्देशंकानूसार मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करून दरमहा 5 हजार रूपये देण्यात यावेत,सुशिक्षित बेरोजगारास दरमहा रूपये 5 हजार बेकारी भत्ता देण्यात यावा ,अनुसूचित जाती जमाती चा अनुशेष भरण्यात यावा,झोपडपट्टी व निवासी भागातील शासनमान्य देशी दारूचे दुकान इतरत्र हलविण्यात यावे,भोगले अॅटोमोटीव्ह प्रा.लि. ( मालक - नित्यानंद भोगले ) रेल्वेस्टेशन एम.आय.डी.सी. येथील परमनन्ट कामगारांना कोणतीही पुर्वसूचना न देता काढून टाकण्यात आल्याने मध्यस्थी करून व्यवस्थापक व कामगारांची संयुक्त बैठक घेऊन समन्यायी तोडगा काढण्यात यावा,सरकारी व खाजगी क्षेत्रातील कंत्राटी पध्दतीने होणारी नोकरभरती रद्द करण्यात यावी .


ह्यावेळी श्रावण गायकवाड, विजयकुमार खंडागळे,आनंद कस्तुरे बाळू गंगावणे, अरविंद कांबळे, दिपक निकाळजे,बलराज दाभाडे, वसंत वक्ते,किशोर खिल्लारे,सचिन निकम,सचिन गंगावणे, सुरेशनाना शिंगारे, सिद्धोधन मोरे ,किशोर गड़कर,अॅड . भगतराज भालेराव,अनिल मगरे,बाळु वाघमारे,सर्जेराव मनोरे,गौतम गणराज,नाना म्हस्के,शैलेंद्र मिसाळ,मनोज वाहूळ,पवन पवार, मनीष नरवडे,सचिन गायकवाड,संदिप जाधव, अनिल सदाशिवे, बाबाभाई दांडगे संजय सातपुते,गौतम भिसे,राहुल मकासरे, कपिल बनकर, राहुल भालेराव, रामेश्वर निकाळजे,पंकज सुकाळे,मिलिंद दाभाडे,महेश रगडे अण्णासाहेब पठारे, सचिन शिंगाडे, सुरज पाखरे,राजु निकाळजे, रमेश आदमाने, विकास हिवराळे, आकाश ढिलपे, आकाश बनसोडे, अमोल घोरपडे, आकाश खिल्लारे, संजय म्हस्के संजय चिकसे,मनिष नरवडे , बाबासाहेब अवसार, गुणरत्न सोनवणे,प्रभू कटारे, हेमंत खोतकर,रामदास ढोले, राजु गरंडवाल,सिध्दार्थ भिसे,अॅड . क्षितीश नितनवरे,प्रकाश निकाळजे,धम्मपाल दांडगे, रवी जावळे,राहुल जाधव,शिल्पा सातपुते,धनुबाई भालेराव,सह लांझी येथील नागरिक,भोगले ऑटोमोटिव्ह चे निलंबित कर्मचारी शेकडो महिला व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages