मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करू ;
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला पालकमंत्री अतुलजी सावे यांची ग्वाही
नांदेड -
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रकार संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी निश्चित पाठपुरावा करू अशी ग्वाही नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे यांनी आज अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी कोषाध्यक्ष व महाराष्ट्र शासनाच्या पत्रकार अधिस्वीकृती समितीचे लातूर विभागीय अध्यक्ष विजय जोशी,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक राम तरटे यांच्या नेतृत्वाखालील आमच्या एका शिष्टमंडळाला नांदेड येथे दिली.
अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांच्या सुचनेनुसार व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक अँड.प्रदिप नागापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एका शिष्टमंडळाने त्यांची डॉ.शंकरराव चव्हाण नियोजन भवन,नांदेड येथे भेट घेतली. यावेळी खासदार अशोकराव चव्हाण यांचीही उपस्थिती होती.
राज्यात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ओळखल्या जाणाऱ्या माध्यम क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.निर्भीडपणे पत्रकारिता करण्यासाठी पत्रकारांवर अप्रत्यक्ष दबाव येत आहे.ही परिस्थिती लक्षात घेता लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम 2017 मध्ये हा कायदा बनविण्यात आला. त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये या कायद्याला महामहीम राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असली तरीही महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत हा कायदा प्रभावीपणे अंमलात आणलेला नाही. त्यामुळे पत्रकार संरक्षण कायद्याची तातडीने कठोर अंमलबजावणी करावी. यासाठीची शासन अधिसूचना तातडीने जारी करावी.यासाठी आपण आपल्या स्तरावरून राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठपुरावा करावा.पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र या देशातील पहिले राज्य व्हावे यासाठी आपण पाठपुरावा करावा अशी विनंती आज पालकमंत्री ना. अतुलजी सावे यांच्याकडे निवेदनाद्वारे पत्रकार अधिस्वीकृति समितीचे विभागीय अध्यक्ष विजय जोशी, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती नांदेड जिल्हा समन्वयक राम तरटे तसेच,नांदेड महानगर मराठी पत्रकार संघ कार्याध्यक्ष गजानन कानडे,जिल्हा सरचिटणीस अनुराग पोवळे,अंकुश सोनसळे, योगेश लाटकर,अ.भा.डिजीटल मिडिया संपादक व पत्रकार संघटना मराठवाडा अध्यक्ष प्रवीण खंदारे,जिल्हाध्यक्ष महेंद्र देमगुंडे,राजू कोटलवार,महानगर मराठी पत्रकार संघाचे कंठक सूर्यतळ,प्रशांत गवळे,डिजीटल मिडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष संघरत्न पवार,जयवर्धन भोसीकर,कुवरचंद मडले,अभिषेक एकबोटे,नकुल जैन,मोहम्मद रफीख,राहुल सरपाटे आदी सहकांऱ्यासह आम्ही निवेदनाद्वारे केली.


No comments:
Post a Comment