जयवर्धन भोसीकर
नांदेड, (प्रतिनिधी) - महाकवी वामनदादा कर्डक जयंती महोत्सव संयोजन समितीचे संयोजक, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते संजय निवडंगे यांचे वडील दत्ता लक्ष्मण निवडंगे यांचे आज दिनांक २८ मे रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९५ वर्षाचे होते. पिंपळगाव कोरका येथील मूळ निवासी असलेले दिवंगत दत्ता लक्ष्मण निवडंगे हे नांदेड येथे अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील बॅरिस्टर खोब्रागडेनगर नंबर एक मधील रहिवासी आहेत. दिवंगत दत्ता निवडंगे यांच्या पश्चात पाच मुले, दोन मुली, सुना, जावई, नातू पणतू असा मोठा परिवार आहे. दिवंगत दत्ता लक्ष्मण निवडंगे यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी १२ वाजता नांदेडच्या गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments:
Post a Comment