स्वाभिमानी मुप्टा संघटनेच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक आणि ऍड बाळासाहेब आंबेडकर यांना डिलिटची मागणी मान्य न झाल्यास डीलीट प्रदान कार्यक्रमास तीव्र विरोध करणार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 31 May 2022

स्वाभिमानी मुप्टा संघटनेच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक आणि ऍड बाळासाहेब आंबेडकर यांना डिलिटची मागणी मान्य न झाल्यास डीलीट प्रदान कार्यक्रमास तीव्र विरोध करणार

औरंगाबाद:

स्वाभीमानी मुप्टा प्राध्यापक र संघटनेच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांना महान कवी गायक गीतकार आणी संगीतकार वामनदादा कर्डक तसेच वंचितांचे राष्ट्रीय नेते ऍड बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनाही शरद पवार आणि नितीन गडकरी सोबत मानद डीलीट पदवीने सन्मानीत करण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले.  मागील 20 वर्षांपासून वामनदादांना डीलीट द्यावी यासाठी आपन विविध माध्यमातून निवेदने दिली,या बाबत सविस्तर माहिती दिली. निवेदनात मुप्टा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ शंकर अंभोरे,कार्याध्यक्ष डॉ किशोर साळवे,डॉ युवराज धबडगे, डॉ बाळासाहेब लिहिणार, डॉ अरुण शिरसाट,डॉ सचिन बोर्डे, डॉ नवनाथ गोरे, डॉ विजय बैसने, डॉ राहुल तायडे, डॉ प्रेमराज वाघमारे, डॉ सुशील बोर्डे, डॉ सागर चक्रनारायण आदींसह पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

No comments:

Post a Comment

Pages