गांजा अंमलीपदार्थाची लागवड करणाऱ्या आरोपीस जेरबंद करून 1,21,050रु किंमतीचा 24 किलो 250 ग्रँम वजनाचा गांजा जप्त ; फर्दापुर पोलिसांची कारवाई - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 27 July 2022

गांजा अंमलीपदार्थाची लागवड करणाऱ्या आरोपीस जेरबंद करून 1,21,050रु किंमतीचा 24 किलो 250 ग्रँम वजनाचा गांजा जप्त ; फर्दापुर पोलिसांची कारवाई

औरंगाबाद:

फर्दापुर पोलीस ठाणे हद्दीत मौजे रवळा शिवारातील गट क्र.09 मध्ये गांजा सारखी झाडे आहेत अशी माहिती गुप्त बातमीदारा मार्फत स.पो.नि. डी. बी.वाघमोडे यांना मिळाली. सदर ठिकाणी पोलीस पथकासह व राजपत्रित अधिकारी ,कृषी पदवीधारक अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता शेतात असलेला इसम नामे रामचंद्र शिंदे यास मिळालेल्या माहितीची थोडक्यात हकीकत सांगितली .सदर शेतीची सर्वांनी पाहणी केली असता शिंदे यांच्या शेतात केली पिकाच्या मधोमध गांजा सारखी दोन झाडे दिसून आली.रामचंद्र शिंदे यांच्या शेतातुन 24 किलो 250 ग्रँम वजनाचा एकूण 1,21,050 रु. किंमतीचा हिरवा पाला असलेला गांजा नावाचा अंमली पदार्थ माल जप्त करण्यात  आला. डी. बी. वाघमोडे सहा. पोलीस निरीक्षक फर्दापुर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी यांच्या विरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास आर.जी.कासले पो.उपनिरीक्षक फर्दापुर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Pages