शेतातील पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत दया-संभाजी ब्रिगेड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 22 July 2022

शेतातील पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत दया-संभाजी ब्रिगेड

 


किनवट :- तालुक्यातील अतिवृष्टी शेतकऱ्याच्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी असे निवेदन तहसीलदार यांना मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड कडून देण्यात आले मागील आठवडा भरापासून तालुक्यामध्ये व परिसरामध्ये चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या पंधरा दिवसापासून सूर्यदर्शन झाले नाही सततच्या पावसामुळे अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे एक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे शेतकऱ्यावर दुपार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे आर्थिक नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपयाची तात्काळ मदत द्यावी अशा मागणीची निवेदन मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड तर्फे देण्यात आले या निवेदनावर संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष अजय कदम पाटील शहराध्यक्ष रणजीत चव्हाण शहर कोषाध्यक्ष अतुल खरे तालुका उपाध्यक्ष सुरेश जाधव सचिव सुरज चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages