मराठवाड्यात एक्स्पोर्ट आधारित उद्योगांना मोठी संधी! फ़िओ आणि सीएमआयएतर्फे आयोजित निर्यात आधारित उद्योग परिषदेत व्यक्त झाले मत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 27 July 2022

मराठवाड्यात एक्स्पोर्ट आधारित उद्योगांना मोठी संधी! फ़िओ आणि सीएमआयएतर्फे आयोजित निर्यात आधारित उद्योग परिषदेत व्यक्त झाले मत

औरंगाबाद:

मराठवाडा विभागात निर्यात क्षमता असलेल्या कृषी क्षेत्रातील आणि उद्योग क्षेत्रातील संस्थांमध्ये मोठी क्षमता असून आगामी काळात या भागातून निर्यातशील उद्योग तयार व्हावे या करिता विशेष प्रयत्न केले पाहिजे असे मत उद्योजक आणि फेडरेशन ऑफ एक्स्पोर्ट असोशिशनच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल यांनी व्यक्त केले ते फियो, सीएमआयए आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) तर्फे आयोजित अन्न प्रक्रिया आणि निर्यात आधारित उद्योग परिषदेत बोलत होते. 


या एकदिवसीय परिषदेचे आयोजन केंद्र सरकारच्या एक जिल्हा, एक उत्पादन या उपक्रमाच्या अंतर्गत मराठवाड्यातील कृषी आधारित आणि उद्योग क्षेत्रातील निर्यात्शील उद्योगांना चालना देण्यासाठी करण्यात आले. केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा हा पुढाकार प्रदेशातील निर्यात वाढ पूर्ण क्षमतेने, आणि आर्थिक वाढ होण्यासाठी आहे. 


कार्यक्रमात बोलतांना सीएमआयएचे अध्यक्ष नितीन गुप्ता म्हणाले कि, सीएमआयएतर्फे या तरुण पिढीकडे जबाबदारी देण्यात आली आहे. या वर्षीच्या कामाच्या प्राधान्यक्रमात आम्ही आपल्या बिभागातून निर्यात कश्याप्रकार वाढेल यासाठी प्रयत्न करणार आहोत. लोकल ते ग्लोबल या उपक्रमाच्या माध्यमातून कृषी आणि उद्योग क्षेत्रातून निर्यात क्षमता असणाऱ्या उद्योगांना चालना घेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत असे ते म्हणाले. त्यांनी निर्यात उद्योगाला चालना देण्यासाठी आयोजित या परिषदेचे आयोजन केल्याबद्दल फिओ संघटना आणि एसबीआय बँक यांचे विशेष आभार मानले.


फ़िओ संस्थेच्या पश्चिम विभागाचे उपसंचालक अंकित शहा म्हणाले कि भारतामध्ये निर्यातीच्या प्रमाणात मागच्या काही वर्षात मोठी वाढ झाली आहे, या निर्यातीने आता ६६९ बिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला असून सरकारतर्फे देखील याकरिता पुढाकार घेण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.


याप्रसंगी एक्स्पोर्ट तज्ञ विनायक टेमगिरे यांनी निर्यात करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले, कोणत्याही उत्पादनाचे किंवा सेवांची निर्यात करताना मार्केट रिसर्च, पेमेंट सुरक्षा, आणि निर्यात संबंधी सखोल माहिती असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.


या प्रसंगी फ़िओ संस्थेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, उप संचालक अंकित शहा  सीएमआयए अध्यक्ष नितीन गुप्ता, मानद सचिव अर्पित सवे, कृष्णा दास नायर, फॉरेन ट्रेड, डीजीएफट, पुणे, किशोर झाडे, कृषी केंद्र औरंगाबाद, एसबीआय बँक अधिकारी, विनायक टेमगिरे, एक्स्पोर्ट कन्सल्तंट विभाग्तील शेतकरी आणि निर्यातदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages