प्रधानसांगवी आरोग्य उपकेंद्रातील ग्रामपंचायतीने संगोपण केलेल्या झाडांची कत्तल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 4 July 2022

प्रधानसांगवी आरोग्य उपकेंद्रातील ग्रामपंचायतीने संगोपण केलेल्या झाडांची कत्तल

किनवट,दि.04(प्रतिनीधी) : जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरणाबाबत सर्व देश जागरूक होऊन वृक्षारोपण व संवर्धनावर जोर दिल्या जात आहे. राज्यातही कोट्यावधी रुपये खर्च करून शतकोटी वृक्ष लागवडीची मोहीम राबविली गेली.‘झाडे लावा़, झाडे जगवा’चा घोष सतत दिल्या जात असतांनाच किनवट तालुक्यातील प्रधानसांगवी आरोग्य उपकेंद्रातील काही कर्मचार्‍यांनी मात्र कहरच केला असून, कुणालाच कल्पना न देता गावातील एकाला कंत्राट देऊन उपकेंद्रातील झाडे यंत्राद्वारे कापून टाकली, असे गावकर्‍यांचे म्हणणे आहे.


     किनवट तालुक्यातील प्रधानसांगवी हे काही वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी  दत्तक घेतलेलेे गाव असून, या गावाने ‘स्मार्ट व्हिलेज’ या योजनेत दहा लाखाछ बक्षिसही मिळविले आहे. ग्रमापंचायतमार्फत विविध विकास कामे व योजना राबवून शाळा,अंगणवाडी,आरोग्य केंद्रात सर्व सुखसुविधा पुरविल्या गेल्या आहेत.  त्यातच काही वषापूर्वी ग्रामपंचायतीने आरोग्य केंद्राच्या आवारात संरक्षक भिंतीच्याकडेने सुंदर वृक्षारोपण करुन ती झाडे वाचवलीसुद्धा होती. चहुबाजुंनी थंडगार सावली देणार्‍या झाडाखाली उन्हाळ्यात गावकरी, मुले विसावा घेत होती. दरम्यान आरोग्य कर्मचार्‍यांना कुठुन दुर्बुद्धी सुचली देव जाणे; मात्र नियमीत कर्तव्य न बजावता महीना पंधरा दिवसातून क्कचितच कर्तव्यावर येणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमताने  मशीनने झाडे कटाई करणार्‍याला काही पैसे व निघणारे जळतन तुम्हालाच असा सौदा करत चक्क झाडांची बुंध्यातूनच कत्तल करण्यात आली.

  ही बातमी गावात कळल्यानंतर काही सुजान नागरीक व पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे यांनी संबधीतांशी भ्रमणभाषद्वारे संपर्क केला असता थातुर मातुर उत्तरे देत फोन कट केल्या गेला,असे मुंडे यांचे म्हणणे आहे. या वृक्षतोडीस नेमकं जबाबदार कोण? ग्रामपंचायत, वनविभाग किंवा आरोग्य विभागातील कुणाची परवाणगी घेतली गेली का? कर्तव्यात कसूर करीत  सतत गैरहजर राहणारे कर्मचारी एवढी मोठी झाडे कुणालाच कल्पना न देता कशी तोडू शकतात? याची चर्चा गावात सुरू आहे. या प्रकरणात संबधीत यंत्रणेने लक्ष घालून जर काही कार्यवाही केली नाही तर गावातील नागरीकांसह पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे हे लवकरच उपोषण करणार असल्याचे त्यांनी तालुका आरोग्य अधीकारी,वनपरीक्षेत्र अधिकारी यांना कळविले असल्याचे सांगितले. आता ‘झाडे लावा झाडे जगवा’ म्हणणारे प्रशासन याबाबत काय कार्यवाही करते याकडे तमाम पर्यावरणप्रेमी जनतेचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Pages