पर्यावरणाच्या जागरासाठी सुखना बोलावते आहे कविसंमेलनाचे आयोजन अध्यक्षपदी डॉ. प्रतिभा अहिरे , दयानंद माने यांच्या हस्ते होणार उदघाटन.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 4 July 2022

पर्यावरणाच्या जागरासाठी सुखना बोलावते आहे कविसंमेलनाचे आयोजन अध्यक्षपदी डॉ. प्रतिभा अहिरे , दयानंद माने यांच्या हस्ते होणार उदघाटन..

औरंगाबाद : सुखना बचाओ जन आंदोलन संघर्ष समिती औरंगाबाद, त्रैमासिक तिफण, आणि भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद औरंगाबाद यांच्या वतीने कै. भिकाजीराव हुसे यांच्या स्मृति प्रित्यर्थ दि. १० जुलै रोजी दुपारी ४ वा. एका जन आंदोलनाची हाक देण्यासाठी , पर्यावरणाच्या जागरासाठी सुखना बोलावते आहे या निमंत्रितांच्या कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी भवन समर्थ नगर औरंगाबाद येथे संपन्न होणाऱ्या या कवि संमेलनाच्या अध्यक्षपदी परिवर्तनवादी कवयित्री डॉ. प्रतिभा अहिरे तर उद्घाटक म्हणून दै. सकाळचे कार्यकारी संपादक दयानंद माने यांची निवड करण्यात आली आहे. शिवाजी महाविद्यालय कन्नड चे प्राचार्य डॉ. विजय भोसले, महात्मा गांधी स्मारक निधी औरंगाबाद केंद्राचे कार्याध्यक्ष डॉ. मच्छिंद्र गोर्डे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कवि संमेलनात डॉ. ललित अधाने, डॉ. प्रभाकर शेळके, डॉ. रमेश रावळकर, हबीब भंडारे, माधुरी चौधरी, प्रिया धारूरकर, आशा डांगे, ज्योती सोनवणे, रामचंद्र झाडे, अशोक गायकवाड, लक्ष्मण खेडकर, एम.एम. खुटे, सुनील डोके, धनंजय गव्हाले, सुदाम मगर, सुनील ऊबाळे , नारायण खेडकर, देवानंद पवार, संजय खाडे, अलकनंदा घुगे, एकनाथ शिंदे, डॉ. राज रणधिर, छाया जायभाये, अरुण थोरात, ज्ञानेश्वर गायके, प्रविण दाभाडे, लक्ष्मण वाल्डे, अनिता राठोड आदी कवी कवयित्री सहभागी होणार असून डॉ. समाधान इंगळे हे सूत्रसंचलन करणार आहेत. या पर्यावरण जागराच्या उपक्रमात आपण सहभागी व्हावे असे आवाहन सुखना बचाओ जन आंदोलन संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवाजी हुसे, अध्यक्ष अशोकराव काळे, सचिव डॉ. बाळासाहेब बेळगे, उपाध्यक्ष भाऊसाहेब घुगे, कार्याध्यक्ष शिवाजीराव दांडगे, सहसचिव सुरेश जुए पाटील, संतोष शेजवळ, विशाल हुसे, नारायण अवघड, रामेश्वर पळसकर, सोपान कोळकर, अनिल वावरे, आनंद पारख, बळिराम काळे, प्रा. संदीप हुसे, प्रा. एकनाथ डोळे, चंदू नवपुते, बाबासाहेब पठाडे गजानन दाभाडे, महादेव बोंडारे, अजिंक्य ढाकणे, पांडुरंग नागरे आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages