किनवट तालुक्यातील जलधरा मंडळात पहिल्या अतिवृष्टीची नोंद पाच मंडळात दमदार ते मुसळधार तर उर्वरीत चार मंडळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 5 July 2022

किनवट तालुक्यातील जलधरा मंडळात पहिल्या अतिवृष्टीची नोंद पाच मंडळात दमदार ते मुसळधार तर उर्वरीत चार मंडळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

किनवट,दि.05 (प्रतिनीधी) :  तालुक्यात गत तीन दिवस हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडत होत्या. मात्र,रविवारी  रात्रीपासून तालुक्यातील इस्लापूर, जलधरा व शिवणी मंडळात मुसळधार पाऊस बरसण्यास सुरूवात झाली असून, जलधरा येथे यंदाची पहिली अतिवृष्टी झालेली आहे. किनवट,बोधडी मंडळात दमदार तर मांडवी,दहेली,सिंदगी व उमरी या मंडळात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसला आहे. सोमवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासांत तालुक्यातील नऊ मंडळातील एकूण पाऊस 310.5 मि.मी.असून, त्याची सरासरी 34.5 मि.मी.आहे.


      शासनाच्या निकषानुसार गत 24 तासात 65 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाल्यास, त्याची नोंद अतिवृष्टी म्हणून केली जाते. त्या अनुषंगाने जलधरा मंडळात 68.3 मि.मी. पाऊस झाल्याने, अतिवृष्टीची नोंद झालेली आहे.


   सोमवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासात किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून,  कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे.  किनवट- 31(184 मि.मी.); बोधडी- 37.8(224.2मि.मी.); इस्लापूर- 62(318.9 मि.मी.); जलधरा- 68.3 (312.7 मि.मी.); शिवणी- 59.8(296.0 मि.मी.); मांडवी- 9.8(161.5 मि.मी.);  दहेली- 12(171.6 मि.मी.), सिंदगी मो. 15.5 (138.2 मि.मी.); उमरी बाजार 14.3 (180.8 मि.मी.).


   तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून आजपर्यंतचा पडलेला एकूण पाऊस 1,987.9  मि.मी.असून, त्याची सरासरी 220.88 मि.मी.येते.  आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक पाऊस इस्लापूर मंडळात झाला असून, सर्वात कमी सिंदगी मोहपूर मंडळात झालेला आहे. तालुक्यात सोमवार 04 जुलै पर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस  227.9 मि.मी.असून, त्या तुलनेत 96.9 टक्के पाऊस पडलेला आहे. 


01 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान किनवट तालुक्यात पडणारा वार्षिक पाऊस 1026.58 मि.मी.असून, या तुलनेत आतापर्यंत तालुक्यात 21.52 टक्के पाऊस पडलेला आहे. या पावसाने पेरणी वाया जायची भीतीने चिंताग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा मिळालेला आहे.

No comments:

Post a Comment

Pages