मुंबई दि. 8- दलित पँथर या क्रांतिकारी संघटनेचा यंदा 9 जुलै रोजी 50 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त दलित पँथर सुवर्ण महोत्सव सोहळा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली दि.9 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रसिद्ध विचारवंत मा. मलेपल्ली लक्षमय्या उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच अमेरिकेतील डॉ.जाकोबी विल्यम्स आणि डॉ.रावसाहेब कसबे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास मुंबईतील आंबेडकरी जनतेने ; रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment