शासकीय वसतिगृह प्रवेशप्रकिया सुरु, अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 3 July 2022

शासकीय वसतिगृह प्रवेशप्रकिया सुरु, अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

पुणे :

 समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षा करिता  शालेय विद्यार्थ्यानी दि.१५ जुलै २०२२ पर्यंत तर व्यासायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यानी दि. दि. ३० सप्टेबर २०२२ पर्यंत पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाकडुन करण्यात आले आहे.  अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील  शालेय विद्यार्थी , इयत्ता १० वी व ११ वी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक / व्यवसायीक अभ्यासक्रमातील प्रथम व व्दितीय वर्षांच्या प्रवेशीत विद्यार्थ्याना  समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येईल. त्याचप्रमाणे, तालुका स्तरावर मुला/मुलींचे शासकीय वसतिगृह येथे इयत्ता ८ वी पासुन ते पुढील अभ्यासक्रमांकरिता प्रवेश अर्ज वाटपाबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे.

शालेय विद्यार्थीसाठी दि १५ जुलै २०२२ , इयत्ता १० व ११ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थीसाठी दि ३० जुलै २०२२ , बी.ए./बी.कॉम/ बी.एस.सी अश्या १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका / पदवी आणि एम.ए / एम.कॉम. / एम.एस.सी असे पद्वी नंतरचे पदव्युत्तर, पद्वी, पदवीका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसयीक अभ्यासक्रम वगळुन) विद्यार्थी यांच्यासाठी अर्ज करण्याची मुदत ही दि  २४ ऑगस्ट २०२२ पर्यंत आहे. तर व्यासायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यर्थ्यानी दि. ३० सप्टेबर २०२२ पर्यंत  अर्ज सादर करता येणार आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नाश्ता, भोजन,निवासाची सोय, शैक्षणिक साहित्य तसेच निर्वाह भत्ता देण्यात येतो.

विद्यार्थ्यांना ज्या वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल तेथुन अर्ज प्राप्त करुन नमुद दिनांकापर्यत आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. विद्यार्थ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपले अर्ज विहीत वेळेत समक्ष परिपूर्ण माहितीसह सबंधित वसतिगृहातच सादर करावेत, अधिक माहिती साठी संबंधित शासकीय वसतिगृह तसेच सबधित जिल्हाचे सहायक आयुक्त कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन 


No comments:

Post a Comment

Pages