जिल्हा परिषद, पंचायत समितीचा आरक्षण सोडत कार्यक्रम तूर्त स्थगित - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 12 July 2022

जिल्हा परिषद, पंचायत समितीचा आरक्षण सोडत कार्यक्रम तूर्त स्थगित

नांदेड  दि. 12 :- राज्‍य निवडणुक आयोगाने जिल्‍हा परिषद व पंचायत समित्‍यांच्‍या आरक्षण सोडत कार्यक्रम तुर्त स्‍थगित केला आहे. याबाबतचा सुधारीत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम यथावकाश देण्‍यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) यांनी दिली आहे. 


राज्‍य निवडणूक आयोगाच्‍या कार्यक्रमानुसार नांदेड जिल्‍हा परिषदेच्या सदस्‍यपदासाठी आरक्षणाची सोडत 13 जुलै रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथील डॉ. शंकरराव चव्‍हाण नियोजन भव‍न येथे  जिल्‍हाधिकारी यांच्या अध्‍यक्षतेखाली  काढण्‍यात येणार होती. तसेच सर्व तालुका मुख्‍यालयी संबधीत पंचायत समिती सदस्‍यांच्‍या आरक्षणाची सोडत संबधीत तहसिलदार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली व उपविभागीय अधिकारी यांच्‍या नियंत्रणात 13 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वा. काढण्‍यात येणार होती. हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तुर्त स्‍थगित केला आहे.


No comments:

Post a Comment

Pages