नांदेड दि. 27 -
महाविहार परिवारातर्फे शनिवार, दि. 30 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता आंबेडकरी चळवळीशी निगडित ख्यातनाम वक्ते प्रा. एस.एन. क्षीरसागर (बहिर्जी महाविद्यालय वसमत) यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच महाविहार परिवारातील ज्येष्ठ सदस्य तथा महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातून नुकतेच सेवानिवृत्त अभियंता भीमराव हटकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेशजी दुधमल व महावितरण मधून सेवानिवृत्त अभियंता सिध्दार्थ पाटील यांचा सेवानिवृत्तीबद्दल यथोचित सत्कार आणि वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
तरी परिसरातील सर्व बंधू, भगिनींना विनंती करण्यात येते की आपण या अभ्यासवर्ग व सत्कार सोहळ्यास मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन असे आवाहन असे आवाहन महाविहार परिवारातील यशवंतराव गच्चे, साहेबराव पुंडगे, एस.टी. पंडित आदींनी केले आहे. हे व्याख्यान माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोगनगर, नांदेड येथे होणार आहे.
No comments:
Post a Comment