किनवट : स्व. चुनिभाई मोतीभाई पटेल चॅरीटेबल ट्रस्ट यवतमाळ, साने गुरुजी रुग्णालय व संशोधन केंद्र किनवट व सुनेत्रा चिकित्सालय, पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने विनामुल्य तपासणी शिबीर उपकेंद्र पळशी ता. किनवट येथे संपन्न झाला.
सुप्रसिध्द नाक, कान, घसा तज्ञ डॉ. अनिल पटेल सर यवतमाळ, प्रसिध्द नेत्ररोग तज्ञ व फेको सर्जन डॉ. विनीत रेवणवार पुसद, व साने गुरुजी रुग्णालय किनवटचे डॉ. अशोक बेलखोडे जनरल सर्जन यांनी रुग्णांची विनामुल्य तपासणी केली. समस्त गावाकऱ्यांच्या तर्फे पाहुण्यांचे स्वागत करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी साने गुरूजी रूग्णालयात अंत्यवस्थेत उपचार करुन बरे झालेल्या रुग्णांनी रूग्णालयाचे प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे यांचा सत्कार केला व गावात शिबीर घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले.
दिनांक १२ जुलै २०२२ मंगळवार रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १२:३० वाजेपर्यंत प्रा.आ.उपकेंद्र पळशी तालुका किनवट येथे रूग्णांची तपासणी करण्यात आली. या आरोग्य तपासणी शिबीराचा 48 नेत्ररुग्णांनी, नाक, कान, घसा 22 व जनरल तपासणी 12 असे एकुण 82 रुग्णांनी लाभ घेतला.
या विनामूल्य तपासणी शिबीरासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय नांदेड व तालुका आरोग्य अधिकारी किनवट यांचे मार्गदर्शन व तसेच डॉ. गजानन काळे वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.के. कोठारी (सि.)व स्व. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्राचे प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड यांचे सहकार्य लाभले आहे.
शिबीराच्या यशस्वीतेसाठी साने गुरूजी रूग्णालय मित्र मंडळ पळशीचे कार्यकर्ते उत्तम कोटरंगे, अमृत वाघुलवार, रमेश पडगिलवार, संतोष गुरनुले व साने गुरूजी रूग्णालयाचे व्यवस्थापक संजय बोलेनवार, समुपदेशक अजय वल्लेवार, कृष्णा हल्लाळे, व समीर शेख यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment