किनवट जि.प.च्या 7 तर पं.स.च्या 14 गणांची आरक्षण सोडत जाहीर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 31 July 2022

किनवट जि.प.च्या 7 तर पं.स.च्या 14 गणांची आरक्षण सोडत जाहीर

किनवट,दि.31(प्रतिनिधी) :   किनवट पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया गुरुवारी  पार पडली असून, चौदा गणांपैकी  अनुसूचित जातीला एक, ओबीसीला दोन आणि अनुसूचित जमातीसाठी चार गण/मतदारसंघ आरक्षित झाले. उर्वरीत सात हे सर्वसाधारणसाठी सुटले. बोधडी आणि गोकुंदा या  दोन्ही गट व गणावर अधिराज्य गाजविणार्‍या राजकारण्यांना या सोडतीने हादरा बसला आहे.  एकमात्र निश्चित की, या आरक्षणामुळे सर्वसामान्यांना लोकप्रतिनिधीत्वाची अनपेक्षितपणे संधी मिळणार आहे.


      सार्वत्रिक निवडणूक 2022 साठीच्या आरक्षण सोडत प्रक्रियेचा कार्यक्रम गुरुवारी (28 जुलै) किनवट पंचायत समितीच्या सभागृहात पार पडला. सहायक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या उपस्थितीत तहसिलदार डॉ.मृणाल जाधव यांनी नायब तहसिलदार महंमद रफिक, गटविकास अधिकारी सुभाष धनवेंसह अन्य कर्मचार्‍यांच्या सहाय्याने आणि रतनीबाई राठोड प्राथमिक शाळेतील कु.आदिती सचिन जाधवच्या हस्ते चिठ्ठी काढावयास लावून आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण केली.


     14 गणांचे आरक्षण पुढीलप्रमाणे : घोटी गण हे अनुसूचित जाती साठी तर अनुसूचित जमातीतील महिलासाठी पाटोदा खु.,चिखली खु.,आणि  कोठारी (चि.) व बोधडी (बु.)अनुसूचित जमाती साठी राखीव आहेत. ओबीसी महिलासाठी मांडवी गण आरक्षित असून, उमरीबाजार हा गण ओबीसी प्रवर्गासाठी सुटले.  सर्वसाधारणसाठी सारखणी (महिला), जलधरा (महिला), गोकुंदा (महिला), इस्लापुर (महिला) हे चार गण महिलांसाठी तर मोहपूर, परोटीतांडा व शिवणी हे तीन गण सर्वसाधारणसाठी आहेत. सोडत प्रक्रियेदरम्यान भाजपा, शिवसेना, मुख्यमंत्री शिंदेगट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित बहूजन आघाडी, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) सह अन्य घटकपक्ष संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.


 किनवट विधानसभा क्षेत्रातील सात जिल्हा परिषद गटांपैकी चार गट अनुसुचित जातीकरिता आरक्षित झाले आहेत. गुरूवारी नांदेड येथे संपन्न झालेल्या आरक्षण सोडवणुकी कार्यक्रमानंतर अनेक प्रस्थापित विस्थापित झाले असून, आता सर्वच राष्ट्रीय व राज्य पक्षांच्या दुसर्‍या फळीतील युवक उमेदवारांना यामुळे संधी प्राप्त होणार आहे.


 किनवट विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण 7 जिल्हा परिषद गट तर 14 पंचायत समिती गण आहेत. किनवट तालुक्यातील गटांच्या संरचनेत बदल करण्यात आला असून,  मोहपुर हा गट नव्याने निर्माण करण्यात आला आहे. तसेच पूर्वीच्या उमरी बाजार  या गटाऐवजी  सारखणी ला गट  करण्यात आलेले असून, उमरी बा. हा गण करण्यात आलेला आहे.


सात गटांचे आरक्षण पुढीलप्रमाणे : मोहपूर (अनु.जाती महिला),गोकुंदा (अनु.जाती महिला), बोधडी बु. (अनु.जाती पुरुष), इस्लापूर (अनु.जाती पुरुष) हे चार गट अनु.जातीसाठी आरक्षित झाले असून, सारखणी,मांडवी व जलधारा हे गट सर्वसाधारणसाठी राखीव आहेत.


      सात पैकी चार जिल्हा परिषद गट हे अनु.जातीसाठी आरक्षित झाल्याने, वर्षानुवर्षे या गटामध्ये निवडूण येणारे  प्रस्थापित अडचणीत आले असून, गटासाठी नव्याने गुढग्याला बाशिंग बाधलेल्या व्यक्तींचाही हिरमोड झालेला आहे.

No comments:

Post a Comment

Pages