स्वातंत्र्याचे ७५ वर्ष आणि ..? - स्टॅलिन आडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 14 August 2022

स्वातंत्र्याचे ७५ वर्ष आणि ..? - स्टॅलिन आडे

'घर घर तिरंगा' ही मोहीम व त्या अनुषंगाने अमृतमहोत्सवी स्वातंत्र दिन कार्यक्रम वातावरणनिर्मिती देश भरात मोठ्या उत्साहात सुरू आहे.

 हे अत्यंन्त महत्वाचे व स्वागतार्ह आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे, प्रचंड मोठ्या गॊरवाचा क्षण आहे.प्रचंड बलीदानाने मिळवलेल्या हजारो क्रांतिकारकांच्या रक्ताने दिलेल्या बलीदानाला आठवण करण्याचा क्षण आहे,देशाप्रती प्रेम या निम्मत्ताने हर्षुन बहरुन उठत आहे.पण ७५ वर्षे झाली याचा गौरव व्यक्त करताना हा क्षण  ७५ वर्षाच्या सिंहावलोकनाचा सुध्दा आहे.त्यामुळे जे झाले ते ही मांडले जाईल व जे राहीले त्याचीही चर्चा होईल. हीच वेळ असते की उपेक्षित वर्गाचे,कामगार, कष्टकऱ्यांचे प्रश्न यानिमित्ताने पुढे आणता येतील. त्यामुळे स्वातंत्र्याची किरणे ज्यांच्यापर्यंत पोहोचली नाहीत त्या भटके विमुक्त, आदिवासी, भूमिहीन मजूर, कुपोषित जनता, शहरी झोपडपट्टीत नरकप्राय जगणारे गरीब या सर्वांची वेदना मांडून त्याकडेही लक्ष वेधले जाईल. या निमित्ताने त्यांचे स्मरण होऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा संकल्प केला जाईल.

 घरावर झेंडा लावणारा देशभक्त व न लावणारा देशद्रोही इतकी बटबटीत व्याख्या होऊ नये व डीपी वर तिरंगा ठेवणारा देशभक्त व गरिबीचे फोटो टाकणारा देशभक्त नाही असे वर्गीकरण होऊ नये. 

थोडक्यात अभिमान व्यक्त करू पण त्याचे रूपांतर उन्मादात होऊ नये व आपली देशभक्ती सिद्ध करण्यासाठी इतरांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह नको आणि प्रश्न मांडणे म्हणजे आनन्द व्यक्त करण्याला अपशकुन नव्हे 

अभिमान आनंद आणि  उपेक्षित राहिलेल्या बांधवांकडे लक्ष वेधणे एकाचवेळी व्हायला हवे आणि हीच ती वेळ आहे,समान अधिकार ,समान हक्क देण्याची! 

जय हिंद


-स्टॅलिन आडे (युवक चळवळीतील कार्यकर्ते)


No comments:

Post a Comment

Pages