महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करा- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 13 August 2022

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करा- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ची मागणी

औरंगाबाद :

             राज्यात यावर्षी अतिवृष्टी झालेली असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी सध्या आर्थिक विवंचनेत आहे ,त्यामुळे त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्क  भरू शकत नाही.अश्यातच शैक्षणिक साहित्यावर जी.एस.टी. लागु केल्याने आर्थिक समस्येला सामना करावा लागत आहे.त्यामुळे यावर्षी चे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे अश्या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेस चे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे ,मराठवाडा अध्यक्ष प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रदेश सरचिटणीस सादिक शेख ,मराठवाडा उपाध्यक्ष डॉ. अमोल धंदरे ,शहराध्यक्ष अतुल राऊत, शुभम कांबळे,दिपक बहिर यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  आंबादास दानवे यांना देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Pages