पीएच.डी प्रवेशासाठी कोर्सवर्क उत्तीर्ण होणे अनिवार्य ही अट रद्द करुन, एम.फिलची प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरू करा - नसोसवायएफची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 29 August 2022

पीएच.डी प्रवेशासाठी कोर्सवर्क उत्तीर्ण होणे अनिवार्य ही अट रद्द करुन, एम.फिलची प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरू करा - नसोसवायएफची मागणी

नांदेड दि 29 : पीएच.डी प्रवेशासाठी आणि आरआरसीसाठी स्वा.रा.ती. मराठवाडा विद्यापीठ, नांदेड. ने कोर्सवर्क उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. हे चुकीचे असून पीएच.डी प्रवेशासाठी तसेच आरआरसीसाठी पेठ परिक्षा पास होणे आणि पेठ मधून सुट मिळने गरजेचे आहे. तसेच पीएच.डी ची पदवी प्राप्त करण्यासाठी युजीसीच्या २०१६ च्या नियमानुसार कोर्सवर्क उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. त्या मुळे पीएच. डी प्रवेशासाठी तसेच आरआरसीसाठी कोर्सवर्क उत्तीर्णची अट रद्द करण्यात यावी.  यासाठी  नॅशनल एससी एसटी ओबीसी स्टुडन्ट अँड युथ फ्रंट (नसोसवायएफ) च्या वतीने स्वा.रा.ती.म. विद्यापीठचे कुलगुरुं उद्धव भोसले यांना निवेदन देण्यात आले.


विद्यापीठाने मागच्या दोन वर्षा पासून एम.फिल अभ्यासक्रम  सुरू केला नाही. देशातील अनेक केंद्रीय विद्यापीठामध्ये तसेच राज्यातील विविध विद्यापीठामध्ये एम.फिल अभ्यासक्रम सुरू असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात स्वा.रा.ती.म. विद्यापीठात एम.फिल अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करण्यात यावी.  विद्यापीठ हे शिक्षणाचे व संशोधनाचे केंद्र आहे.त्यामुळे हा अभ्यासक्रम संशोधनासाठी गरजेचा आहे. 

असे विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी नेते डॉ. हर्षवर्धन दवणे,

डॉ. प्रवीणकुमार सावंत, धम्मपाल वाढवे आदींच्या स्वाक्षऱ्या  करत  कुलगुरू महोदयांना निवेदन दिले आहे.


पीएच.डी कोर्सवर्क हे पीएच .डी प्रवेशासाठी व आरआरसी साठी अनिवार्य असल्याची अट रद्द करण्यात यावी.

 शै.वर्ष २०२२-२३ या वर्षाता एम.फिल प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात यावी.

   वरील दोन्ही मागण्या विद्यार्थी हिताय आहेत.या मुळे आपण लवकरात लवकर या मागण्या मान्य करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी नसोसवायएफच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.


  

No comments:

Post a Comment

Pages