सगरोळी येथे विविध उपक्रमांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 16 August 2022

सगरोळी येथे विविध उपक्रमांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती संपन्न

बिलोली , जय भोसीकर:

सगरोळी मधील पोचमपाड येथील क्रांतीसुर्य लहुजी साळवे नगरीत साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती मोठ्या उस्ताहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांची  प्रमुख उपस्थिती होती. या आयोजित कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता श्री रोहित देशमुख व समाज बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात  श्रमदानातून करण्यात आले. तद्नंतर साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन व ध्वजारोहन देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्कृती संवर्धन मंडळाचे प्रकल्प संचालक श्री रोहीत देशमख, सगरोळीचे सरपंच सौ.रुपाली शेळके, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रध्दा आंबुलगेकर,ग्रामपंचायत सदस्य श्री विश्वनाथ समन, शंकर महाजन, शिवराज बामणे,गौतम बाल्लय्या, कोंडलाडे नागोराव, शेख मुर्तुजा, संजय पदमवार, गंगाधर तुडमे, सयाराम निदाने आदी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्रबोधनकार श्री प्राध्यापक वाहूळ सर, श्री आईलवार देवराव हे होते. या वेळी जयंती मंडळाच्या वतीने गरजू मुलां व मुलींना शैक्षणिक साहित्य [ पेन वह्या ] वाटप करण्यात आली. याचबरोबर वयो वृद्ध ८० लोकांना बँल्केटस वाटप करण्यात आले. संस्कृती संवर्धन मंडळ संचलित सनराईज प्रकल्पात धावण्यामध्ये जिल्हास्तरीय अँथलेटिक्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल कु. विनिया माचापुरे व बोडके दुर्गेश्वरी माधव या विध्यार्थीनीचे यथोचित सत्कार करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात सेवानिवृत्त पोचमपाड येथील कर्मचारी श्री येरेवाड एकनाथ व श्री सोनकांबळे निवृत्ती या  दोन व्यक्तीचा सन्मान देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आले. यावेळी सगरोळीचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक पोहचमपहाड नगरीतील बांधव व महिला मोठ्या संख्येने युवा तरुण मंडळी उपस्थित होती.

No comments:

Post a Comment

Pages