स्वातंत्र्यदिन व वामनदादा कर्डक जयंती निमित्त रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची एकताज्योत रॅली उत्साहात संपन्न ; बौद्ध,मुस्लिम,ख्रिश्चन, शीख धर्मगुरूंच्या हस्ते प्रज्वलित केली एकता ज्योत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 16 August 2022

स्वातंत्र्यदिन व वामनदादा कर्डक जयंती निमित्त रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची एकताज्योत रॅली उत्साहात संपन्न ; बौद्ध,मुस्लिम,ख्रिश्चन, शीख धर्मगुरूंच्या हस्ते प्रज्वलित केली एकता ज्योत

औरंगाबाद दि.१६ स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व वामनदादा कर्डक जयंती निमित्त रिपब्लिकन विद्यार्थी सेना,नागसेनवनातील आजी माजी विद्यार्थी ह्यांच्या वतीने एकता ज्योत मोटारसायकल रॅली काढून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.

नागसेनवनातील लुम्बिनी उद्यान येथून बौद्ध भिख्खू नागसेन महाथेरो,ख्रिश्चन धर्मगुरू पास्टर प्रवीण बोरगे,मुस्लिम धर्मगुरू मौलाना ताहेर खासमी,शीख समाजाचे जसप्रीत सिंग ह्यांच्या हस्ते सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून एकता ज्योत (मशाल) पेटवण्यात आली.

यावेळी डॉ.प्रमोद दुथडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर श्रावण गायकवाड,विलास जगताप,राहुल साळवे,प्रा.सिद्धोधन मोरे,मिलिंद बनसोडे,पवन पवार,सतीश जाधव,असकर खान,कुणाल राऊत,अमित कांबळे,दिनेश गवळे ,दीपक जाधव,गौतम साबळे,निलेश बत्तीसे,सिद्धार्थ सदाशिवे,प्रशांत बोराडे,ऍडअतुल कांबळे,गुणरत्न सोनवणे,सचिन गायकवाड ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागसेनवातून मोटारसायकल रॅली द्वारे निघालेली एकताज्योत छत्रपती शाहूमहाराज,महावीर स्तंभ,छत्रपती शिवराय,सावित्रीमाई-ज्योतिबा फुले ह्यांना अभिवादन करून भडकल गेट येथे विसर्जित करण्यात आली.

देशात धार्मिक-जातीय तणाव निर्माण करून फूट पडण्याचे षडयंत्र सुरू असल्याने सामाजिक सलोखा राखून जाती धर्मपेक्षा आपला देश व देशहित महत्वाचे आहे युवकांनी पुढे येऊन देशाच्या एकतेला बाधा पोहचविणाऱ्या देशविघातक शक्ती चा बिमोड करावा असे आवाहन नागसेन महाथेरो व धर्मगुरूंनी केला.

यावेळी आयोजक सचिन निकम,इंजि.अविनाश कांबळे, प्रा.प्रबोधन बनसोडे,कुणाल भालेराव,चिरंजीव मनवर,प्रवीण हिवराळे,सतीश शिंदे,ॲड.तुषार अवचार,गुरू कांबळे,विशाल देहाडे,अमित कांबळे, सचिन शिंगाडे,निखिल आराक,विकास रोडे,तुषार आदके,विशाल बनकर,सम्यक सर्पे, महेंद्र तांबे,रामलिंग कांबळे, किरण गायकवाड आदींनी सहभाग नोंदविला.



No comments:

Post a Comment

Pages