बिलोली ,जय भोसीकर :
दि. 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पानसरे महाविद्यालय अर्जापूर येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दि.13ऑगस्ट रोजी महाविद्यालयाच्या वतीने अर्जापूर येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. दि. 14 रोजी रांगोळी व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तर 15 ऑगस्ट रोजी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी समूह गीत गायन, नृत्य वक्तृत्व,रांगोळी स्पर्धेत सहभाग घेऊन कलागूण सादर करून राष्ट्राला मानवंदना दिली.यावेळी हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मनोहररावजी देशपांडे, सचिव सुनील बेजगमवार, उपाध्यक्ष राजू शेठ उत्तरवार, प्रा.महा पाटील माचनूरकर, संजय दमकोंडावार,प्रदीप अंबेकर प्रकाश अर्जुने, हे उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ. अशोक श्रीरामे तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. समूहगीत गायनामध्ये राष्ट्रभक्तिवर आधारित समूहगीते सादर केली. तसेच देशभक्तीपर नृत्य सादर करून आपली कला दाखवून अनेक विद्यार्थिनींनी यात सहभाग नोंदविला. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्व सहभागी कलाकारांना व स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित केले. यावेळी सांस्कृतिक विभागाचे प्रा.डॉ.आर. जे गायकवाड, प्रा. डॉ.गोपाळ चौधरी प्रा.डॉ. नारायण शिवशेट्टे, प्रा.डॉ.ममता इंगोल तसेच एनएसएस विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. जाधव,प्रा.डॉ शिंदे व क्रीडा विभाग संचालक प्रा.डॉ. महेश वाकरडकर व प्रा. पाटील यांनी प्रयत्न केले. यावेळी सांस्कृतिक विभागाचे प्रा. डॉ. गोपाळ चौधरी यांनी था सर्व कार्यक्रमासाठी नृत्य व समूहगीत गायनाच्या कलाकारांना मार्गदर्शन केले.व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच वादकाची साथ प्रा. शिवकुमार सरकोंडावार तबला, अशोक भालेराव ढोलकी, शिवाजी मोकळे हार्मोनअम यांनी वादनाची जबाबदारी पार पडली.
याप्रसंगी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी झेंडावंदनास उपस्थित राहून या सर्व कार्यक्रमाचा आनंद घेतला. या सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागी कलाकारांचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment