'उज्वल साहित्यरत्न' पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 26 August 2022

'उज्वल साहित्यरत्न' पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

नांदेड - येथील उज्वल प्रतिष्ठानच्या वतीने 'उज्वल साहित्यरत्न' पुरस्कारांसाठी नवोदितांसह सर्व साहित्यिकांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मराठीतील विविध साहित्यकृतींसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव दि. ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत स्विकारण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष प्रकाश ढवळे नागलगांवकर यांनी दिली.


          साहित्यक्षेत्रातील कथा, कविता, नाटक, वैचारिक, आत्मकथन, कादंबरी, ललित, शैक्षणिक, धार्मिक तथा बालसाहित्य  या साहित्यप्रकारांतून एकूण दहा पुरस्कार देऊन साहित्यिकांना गौरविण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी विहित नमुन्यातील प्रस्तावासोबत दोन फोटो आणि दोन साहित्यकृती (पुस्तके)  'उज्वल प्रतिष्ठान, प्रकाश नामदेव ढवळे, कुशीनगर, म. बसवेश्वर पुतळ्याजवळ, नवीन कौठा, नांदेड मो. ९७६६२८४८७३ या पत्त्यावर पाठवावेत असे निवड समितीचे प्रमुख प्रज्ञाधर ढवळे यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Pages