औरंगाबाद दि.२६ विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी 'बांधिलकी' सामाजिक जाणिवांचे अभियान राबविण्यात आले ह्या अभियानातुन संकलित झालेले शैक्षणिक साहित्य आज मिलिंद मल्टिपर्पज हायस्कुल येथे 128 विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले.
ह्यावेळी बाबासाहेबांच्या संकल्पनेतील मिलिंद-नागसेनच खऱ्या अर्थाने समाजाला प्रगतीपथावर नेऊ शकतात म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने बाबासाहेबांच्या विचारांवर मार्गक्रमण करून मिलिंद होण्याचा प्रयत्न करावा असा सूर याप्रसंगी उमटला.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळा महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या उत्कर्षासाठी माजी विद्यार्थ्यांनी योगदान देऊन आपले कर्तव्य पाडावे असे प्रतिपादन श्रावण गायकवाड ह्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक धन्यकुमार टिळक हे होते तर श्रावण गायकवाड,पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार,के.एम.बनकर ह्यांनी मनोगत व्यक्त केले तर विलास जगताप,ऍड.धनंजय बोरडे, ऍड.अभिजित वानखेडे,चंद्रकांत रुपेकर,विशाल सरपे,प्रशांत इंगळे,डॉ.निलेश आंबेवाडीकर ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.
तर संस्थेचे अध्यक्ष सचिन निकम,विशाल सरपे,प्रसेनजीत गायकवाड, चिरंजीव मनवर,आनंद सूर्यवंशी,ऍड.तुषार अवचार,सचिन गायकवाड, सुमित नावकर,अक्षय शेजुळ,कुणाल भालेराव आदींनी उपक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment