औरंगाबाद दि.२२ देशभरात मागासवर्गीय समूहावरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असतांना केंद्र व राज्य सरकार कडून ह्या घटनांना गांभीर्याने घेतले जात नाही आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नसल्याने जातीय अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असल्याने आज भडकलगेट येथे आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
ह्यावेळी पाण्याच्या माठाला स्पर्श केला म्हणून ९ वर्षीय इंद्र मेघवाल ह्या विद्यार्थ्याला मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या छैल सिंग,हिंगोली येथील दिक्षा वाठोरे ह्या तरुणीला विष पाजून मारणाऱ्या सचिन बर्डे व त्याचे कुटुंबीय,पिसादेवी येथील जनार्धन कसारे ह्यांना गायरान जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीचे घाव घालून खून करणाऱ्या शिवाजी औताडे व इतर ह्यांना फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी करत जोरदार आंदोलन करण्यात आले.
समितीचे अध्यक्ष श्रावण गायकवाड,कृष्णा बनकर,बाळू गंगावणे,वसंतराज वक्ते,आनंद कस्तुरे,प्राचार्य राजेंद्र पगारे,बलराज दाभाडे,प्रा.देवानंद पवार,राहुल साळवे,सचिन निकम,दीपक निकाळजे,संतोष मोकळे,बाळू वाघमारे,प्रकाश कांबळे,मनोज वाहुळ,आनंद मोकळे,नानासाहेब शिंदे, द्वारकदास कोतकर,रामकुमार रिडलॉन,रामदास ढोले,अरुण वासनकर,अरविंद कांबळे,कपिल बनकर,सोनू नरवडे,सतीश जाधव ,चंदन दाभाड़े, प्रवीन वाकेकर,मोहन खंडागळे,पंकज सुकाळे, सचिन गायकवाड ,सम्यक सर्पे, एड. तुषार अवचार,संदीप अहिरे,किरण रगडे,रमेश मगरे,संदीप गवळी,कैलास काळे,सचिन गायकवाड,प्रवीण पट्टेकर,हरिदास बोरडे,राहुल गवळी,नागेश केदारे,गणेश साळवे,पवन पवार,मनीष नरवडे,गौतम गणराज,मोहन खंडागळे,अजय बनसोडे,गौरव पारधे,संतोष कांबळे,राहुल भालेराव,विलास सुखधन, प्रवीण केदारे,संदीप भोरगे,सूरज जाधव,सोहन सुरडकर,तुषार आदके,एस पी मगरे, राजेश नावकर आदिंची उपस्थिति होती.
No comments:
Post a Comment