रिपब्लिकन पक्षाची नांदेड जिल्हा व शहर कार्यकारणी जाहीर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 31 August 2022

रिपब्लिकन पक्षाची नांदेड जिल्हा व शहर कार्यकारणी जाहीर

नांदेड :

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या होत्या व सर्व जिल्ह्याच्या नूतन कार्यकारणी निवडण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक बैठक दि. 21 ऑगस्ट रोजी रिपब्लिकन गार्ड भवन डॉ. आंबेडकर नगर, नांदेड येथे घेऊन जिल्हा व शहर कार्यकारिणीची निवड करण्यात आली कार्यकारणी खालील प्रमाणे 

नांदेड जिल्हा दक्षिण जिल्हाध्यक्ष गौतम काळे ,कार्याध्यक्ष सचिन सांगवीकर ,जनरल सेक्रेटरी रामा चिंचोरे ,चिटणीस माणिक गायकवाड ,उपाध्यक्षपदी प्रकाश शिंदे यांची निवड करण्यात आली 

नांदेड उत्तर जिल्हाध्यक्षपदी मिलिंद शिराढोणकर, कार्याध्यक्ष बालाजी धनसरे, जनरल सेक्रेटरी संजय भालेराव, चिटणीस लक्ष्मीकांत हटकर ,उपाध्यक्ष 

धर्माजी सावते, 

नांदेड शहर महानगर अध्यक्षपदी धम्मपाल धुताडे, कार्याध्यक्ष मोहन असोरे, जनरल सेक्रेटरी प्रतिक सोनवणे, चिटणीस शुभम मासदवार ,उपाध्यक्ष आनंद गजभारे ,आदीची नूतन कार्यकारणीत निवडण्यात आल्याची घोषणा विजय सोनवणे यांनी केली या बैठकीला सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती

No comments:

Post a Comment

Pages