विनायकराव मेटे जातीच्या पल्याड विचार करणारं नेतृत्व -डॉ.कैलास अंभुरे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 20 August 2022

विनायकराव मेटे जातीच्या पल्याड विचार करणारं नेतृत्व -डॉ.कैलास अंभुरे

 औरंगाबाद दि 20: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि माजी आमदार विनायकराव मेटे यांचे अकालीन अपघाती निधन झाल्यामुळे सबंध विद्यापीठातील विविध संघटनेच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

   

महाराष्ट्राच्या विकासामध्ये वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून आमदार मेटे साहेबांनी काम केलेले दिसून येते.म्हणून प्रत्येक जाती-धर्माचा विद्यार्थी नेता व्यापारी अधिकारी प्राध्यापक वर्ग त्यांच्या कामातून प्रभावित झालेला दिसून येतो.


अशा नेत्याची सर्वांना गरज असते काळाने अशी माणसं आपल्यापासून हिरावून नेली याचं मनस्वी दुःख या निमित्ताने होते आहे.मराठवाड्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर माननीय विलासराव देशमुख माननीय गोपीनाथरावजी मुंडे आणि परवा माननीय विनायकराव  मेटे हे मराठवाड्याचे भाग्यविधाते होते.


त्यांच्या जाण्याने मराठवाड्यासह महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झालं ही गोष्ट नाकारता येत नाही म्हणून मेटे साहेबांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने भेटी झाल्या त्यांचं कार्य कर्तृत्व जवळून पाहिलेल्या व्यक्तींनी अर्थात डॉ.कैलास अंभुरे ,डॉ.पंजाबराव पडूळ, अँड.शिरीष कांबळे, डॉ.तुकाराम सराफ ,प्रा. प्रकाश इंगळे, पांडुरंग दाभाडे, स्वाती चेके आणि शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश प्रवक्ते तथा जालना जिल्ह्याचे निरीक्षक लक्ष्मण नवले,घुले बोलत असताना आठवणींना उजाळा देत असताना विद्यापीठात शिवाजी महाराजांचा होणार पुतळा, विद्यार्थ्यांच्या सारथी, बार्टी, महाज्योती च्या अडचणी,अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, आरक्षण अशा अनेक प्रश्नांवर आवाज उठवणार सर्वसमावेशक नेतृत्व हरवलं.....!


त्यांच्या जाण्याने सबंध समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.ते केवळ मराठा समाजापुरतेच नेते नव्हते तर ते सर्वसमुदायिक नेतृत्व होत. सर्वसामान्यांना ते आपल्या जवळच वाटायचे आशा गोष्टी माननीय मेटे साहेबांच्या संदर्भात सांगता येतील.


कार्यक्रमाचे अयोजन श्री लक्ष्मण नवले प्रदेश प्रवक्ते.जालना निरीक्षक,आशिष काकडे ,वसुदेव मुळीक, सहकार्याने घडून आले.


 यावेळी डॉ कैलास अंभुरे,प्राध्यापक मराठी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, डॉ.तुकाराम सराफ,युवा सेना, अँड शिरीष कांबळे, जिल्हा संघटक, बहुजन मुक्ती पार्टी,प्रकाश इंगळे, सम्यक आंदोलन संघटना,राहुल वडमारे,जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन बहुजन सेना, त्याशिवाय डॉ.दीपक खिल्लारे,डॉ.अशोक सरोदे,डॉ.पंजाबराव पडुळ,अजय पवार,दैवत सावंत,आशिष काकडे,कुलदीप चव्हाण, उमेश खंदारे,पांडुरंग दाभाडे,स्वाती चेके, भारत चव्हाण, आण्णासाहेब सोनवणे,राधा मोरे.विराज जोगदंड. विशाल सोळंके. घुले सर. हर्षद पवार.आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages