बी.एड च्या प्रश्नपत्रिकामध्ये झाल्या चुका ; रा.वि.काँग्रेसच्या वतीने परीक्षा संचालकाला निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 20 August 2022

बी.एड च्या प्रश्नपत्रिकामध्ये झाल्या चुका ; रा.वि.काँग्रेसच्या वतीने परीक्षा संचालकाला निवेदन

दि.२० ऑगस्ट ( प्रतिनिधी) 

बी.एड च्या प्रश्नपत्रिका मध्ये होणाऱ्या चुकाबद्दल  रा.वि.काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधील परीक्षा संचालकाला निवेदन देण्यात आले. 


बी एड प्रथम व व्दितीय वर्षाच्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेमध्ये पहिल्या पेपर पासून तर आजपर्यंत प्रत्येक पेपरमध्ये व्याकरणाच्या चुका, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या चुका आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असून इंग्रजी मधील प्रश्न ग्राह्य धरावा, मराठीमधील प्रश्न ग्राह्य धरावा, याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. 

प्रश्नपत्रिकेमधील चुकावर योग्य ती कार्यवाही करून भविष्यात अशा चुका होऊ नये आणि आतापर्यंत ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये चुका झालेल्या आहे. यापुढे विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, विद्यार्थ्यांना योग्य गुण देण्यात यावे यासाठी हे निवेदन देण्यात आले. 


या निवेदनावर प्रदेश सरचिटणीस सादिक शेख, मराठवाडा उपाध्यक्ष डॉ. अमोल धांदरे, फरहान अमीन, मोहम्मद नदीम, उमर अहमद, मोहम्मद उबेद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages