औरंगाबाद :
आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने उद्या दि.१४ रोजी देशभरातील मागासवर्गीय, अल्पसंख्याक,आदिवासीच्या होणाऱ्या हत्या व अत्याचाराच्या घाटनाच्या निषेधार्थ एल्गार मार्च चे आयोजन करण्यात आले आहे.
भडकलगेट येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून विभागीय आयुक्त कार्यालयावर हा एल्गार मार्च काढण्यात येणार आहे.
उद्या होणाऱ्या एल्गार मार्च ला रिपाई डेमोक्रॅटिक च्या वतीने रमेश गायकवाड, भारतीय दलित कोब्राचे अशोक बोर्डे,महाराष्ट्र सेनेचे राजू साबळे,रिपब्लिकन सेनेचे चंद्रकांत रुपेकर,प्रा.सिद्धोधन मोरे,भीम आर्मीचे बलराज दाभाडे,राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे संतोष मोकळे,सामाजिक समता संघाचे श्रीरंग ससाणे,विद्रोही पँथरचे आनंद लोखंडे,रिपब्लिकन बहुजन सेनेचे राहुल वडमारे,भीमकायदा चे सुनील सोनवणे,रिपब्लिकन कामगार सेनेचे अशोक मगरे,प्रा.दिपक खिल्लारे आदींसह आंबेडकरवादी पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
एल्गार मार्च मध्ये सर्व आंबेडकरवादी पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे अवाहन समितीचे अध्यक्ष श्रावण गायकवाड ह्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment