औरंगाबाद :
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन या प्रकल्पाचे काम जलद गतीने करावे अन्यथा संबंधित गुत्तेदारांवर कारवाई करण्यात येईल असे कडक निर्देश आज औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सदरील प्रकल्पाच्या आढावा व पाहणी दरम्यान दिले .
आज दुपारी तीन वाजता डॉ. चौधरी यांनी स्मृतिवानास भेट दिली व सुरू असलेले आणि प्रस्तावित कामांच्या सखोल आढावा घेतला .यावेळी अँपी थेटर चे बांधकाम व इतर अर्धवट झालेले कामांची गुणवत्ता तसेच कासव गतीने सुरू असलेले इतर कामांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि संबंधित गुत्तेदाराला कामात सुधारणा आणि गती आणण्यासाठी पंधरा दिवसाची वेळ दिली.
No comments:
Post a Comment