औरंगाबाद : मागील दोन वर्षांपासून विविध आंदोलन उपोषणच्या माध्यमातून वेळोवेळी निवेदन अर्ज करून देखील बार्टीच्या प्रशासनाची भूमिका उदासीन असल्याचे दिसून आले आहे.वेळोवेळी पाठपुरावा करून देखील शासन निर्णय घेण्यात दिरंगाई करत आहे.त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांना
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन अधिछात्रवृत्ती २०१८ (BANRF) MPHIL च्या १८६ विद्यार्थ्यांना P.hd साठी नियमित करून देणे ,डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन अधिछात्रवृत्तीच्या P.hD च्या २०१८ विद्यार्थ्यांना ५ वर्षे फेलोशिप देण्यात यावी, सारथी महाज्योती या संस्थे प्रमाणे बार्टीच्याही विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृत्ती देण्यात यावी.
या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आले असता निदर्शनास आणून दिल्या त्यांनी लवकरच बार्टीच्या वेगवेगळ्या समस्या विषयी लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार व प्रश्न मार्गी लावणार असे आश्वासन निवेदनकर्त्याना दिले.
यावेळी अक्षय जाधव नारायण खरात व अतूल कांबळे यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment