औरंगाबाद दि.१७ विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे एकमेव सुपुत्र सुर्यपूत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर ह्यांच्या ४५ व्या स्मृतिदिनी रिपब्लिकन विद्यार्थी सेना व आंबेडकरी पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने भडकलगेट येथे अभिवादन करण्यात आले.
ह्यावेळी बाबासाहेबांनी भारत बौद्धमय करण्याचा संकल्प केला त्यासाठी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली परंतु बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर धम्मचळवळ थांबेल की काय अशी शंका व्यक्त होताना भैय्यासाहेबांनी धम्मचळवळीत स्वतःला झोकून दिले महाराष्ट्राबाहेर पंजाब व उत्तरेकडील राज्यात स्वतः धम्मचळवळ गतिमान केली,भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य आजतागायत दिशा देत आहे,चैत्यभूमी येथे होणारे अंतरराष्ट्रीय स्मारक देखील भैय्यासाहेबांच्या संकल्पनेतून साकारले जात आहे असे प्रतिपादन श्रावण गायकवाड यांनी केले.
ह्यावेळी चंद्रकांत रुपेकर,प्रा.सिद्धोधन मोरेह्यांच्या हस्ते भैय्यासाहेबांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
अॅड.रुपराव खंदारे ह्यांनी भैय्यासाहेबांच्या जीवनावरील आधारित गीते सादर केली.
भारतीय बौद्ध महासभेचे प्रदीप मिसाळ ह्यांनी सामूहिक त्रिसरण पंचशील दिले.
तर सचिन निकम,मिलिंद बनसोडे,अशोक गरुड,मधुकर ठोंबरे,के सी गजभिये,शैलेंद्र मिसाळ,राहुल वडमारे,,मनीष नरवडे,सचिन शिंगाडे,मिलिंद पट्टेकर,आनंद सूर्यवंशी,अविनाश कांबळे, प्रवीण हिवराळे,तुषार अवचार,शैलेंद्र म्हस्के,सम्यक सर्पे,सतीश शिंदे,सुधाकर साबळे,संदिप अहिरे,पिंटू भिंगारे,राजू हिवराळे,सनी देहाडे,सिद्धार्थ मोरे,गणेश रगडे,धम्मपाल भुजबळ,दिनेश नवगिरे,सोमु भटकर आदींसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकारी ह्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment