रिपाइं (आ.) कडून चव्हाण- कसारे कुटुंबियांना आर्थिक मदत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 17 September 2022

रिपाइं (आ.) कडून चव्हाण- कसारे कुटुंबियांना आर्थिक मदत

औरंगाबाद: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  ए च्या वतीने मयत किरण चव्हाण यांची पत्नी जया चव्हाण यांना  एक लाखाचा आणि मयत जनार्धन कसारे यांची पत्नी कलाबाई कसारे यांना पन्नास हजाराचा धनादेश पक्षाचे कार्याध्यक्ष बाबूराव  कदम व मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके यांच्या हस्ते  शनिवारी प्रदान करण्यात आला. यावेळी चव्हाण व कसारे कुटुंबियांचे अन्य सदस्यही उपस्थित होते. सुभेदारी गेस्ट हाऊसवर हा धनादेश प्रदान कार्मक्रम झाला. चव्हाण आणि कसारे यांचा काही दिवसांपूर्वी जातीय व्देष भावनेतून खून झाला.

   शुक्रवारी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  या दोन्ही कुटुंबियांची अनुक्रमे खिर्डी व पिसादेवी येथे  भेट देऊन  आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिेले होते. त्याची लगेच पूर्तता करण्यात आली.

याप्रसंगी किशोर थोरात राज्य उपाध्यक्ष किशोर थोरात, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण इंगळे, शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड, मराठवाडा सचिव कुंदन लाटे, जिल्हा सरचिटणीस प्रवीण नितनवरे, माजी नगरसेवक प्रकाश गायकवाड, देवराज वीर, खुलताबाद तालुका अध्यक्ष फकीरराव भालेराव, भाऊसाहेब बनकर, वाल्मीक समाजाचे दौलत किशोर साळवे, विशाल सोनवणे,  राकेश पंडित, महेंद्र खरात, ईश्वर चव्हाण, शुभम डोळस, संतोष जाधव, मनोज भालेराव आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages