बिलोली तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी धम्मानंद धोतरे यांची बिनविरोध निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 18 September 2022

बिलोली तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी धम्मानंद धोतरे यांची बिनविरोध निवड

बिलोली (जय भोसीकर)  : डी एन इ  १३६ महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा बिलोली तालुका अध्यक्षपदी सगरोळी येथिल ग्रामविकास अधिकारी धम्मानंद धोतरे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

             बिलोली पंचायत समिती सभागृहामध्ये दिनांक १६ सप्टेंबर रोजी शुक्रवारी डी एन इ १३६ महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा बिलोली तालुका ग्रामसेवक संघटनेची बैठक पार पडली .बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष धनंजय वडजे,जिल्हा सरचिटणीस हणमंतराव वाडेकर,मानद अध्यक्ष गोविंदराव माचनवाड,जिल्हा कार्याध्यक्ष श्रीनिवास मुगावे,नायगाव तालुका अध्यक्ष टी.जी.पाटिल रातोलीकर,जिल्हा उपाध्यक्ष पी डी वाघमारे यांच्या प्रमूख उपस्थितीमध्ये निवडीबद्दल बैठक घेण्यात आली.यावेळी बिलोली तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी संघटनेमध्ये प्रदीर्घ अनुभव असलेले सगरोळी ग्रामपंचायत चे ग्राम विकास अधिकारी धम्मानंद हरिराव धोतरे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी ग्रामसेवक संघटनेचे नूतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.यावेळी मानद अध्यक्ष आर एम हाळे,सचिवपदी अरुण जमदाडे,सहसचिव वडजे वी वी,तालुका कोषाध्यक्ष सुनील हाळदेवाड,कार्याध्यक्ष मुरलीधर उत्तरवाड,उपाध्यक्ष एस बी खतगावे,यू.टी.जाधव,महिला उपाध्यक्ष एस एन ककावांर,सल्लागार पांचाळ वि.डी, आडे पी. जी.,कमठेवड जी के, संघटक महेश पेंडकर, शिंदे एस बी,लेख परीक्षक वेंकट इंगळे, प्रसिध्दी प्रमुख तांगाडे, सदस्य राज ढवळे ,नितीन कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Pages