मातंग समाजावरील वाढत्या अत्याचाराकडे नांदेड पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष का ?: प्रा रामचंद्र भरांडे यांचा सवाल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 18 September 2022

मातंग समाजावरील वाढत्या अत्याचाराकडे नांदेड पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष का ?: प्रा रामचंद्र भरांडे यांचा सवाल

नांदेड: -नांदेड जिल्ह्यातील मातंग समाजातील नागरिकांवर विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अत्याचार झाल्याच्या घटना घडत असताना जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे अशा गंभीर घटनांकडे कसे काय दुर्लक्ष करू शकतात असा सवाल लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा रामचंद्र भरांडे यांनी केला आहे.

मौजे ढाकणी ता लोहा येथील कांबळे पती पत्नीवर गावातील व्यक्ती आपल्याकडे असलेल्या संपत्ती व राजकीय लागेबांधे च्या जोरावर मालकीचा प्लाट हाडप करतो, उलट जिवे मारण्याचा प्रयत्न करतो.ह्या  सर्व घटनेची पुर्व पार्श्वभूमी माहीत असलेले सोनखेड पो स्टेशनचे पो निरीक्षक गुन्हा नोंदवण्यात जाणिवपूर्वक विलंब करतात कशासाठी..?

दुसरी घटना तेवढीच संवेदनशील आहे.ती अशी की, लोकस्वराज्य आंदोलनाचे मराठवाडा कोष्याध्यक्ष अर्जून गायकवाड यांच्या वर 295 हा धार्मिक विद्वेष पसरवल्याचा गुन्हा नोंदवला.कसलाही दोष नसताना अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवला जात असेल तर  प्रमुख म्हणून जिल्हा अधिक्षकांचे लक्ष कशात आहे..?    

वाघी ता. नांदेड येथील 

अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती स्थळ जागेवर झालेल्या अतिक्रमणाचा विषय आहे. गेल्या वर्षभरापासून वाघी येथील नागरिक महिला, पुरुष तरूण हे "आमच्या हक्काची जागा आम्हाला वापरण्यासाठी देण्यात यावी,यासाठी निवेदन, उपोषण, धरणे करीत आहेत.नांदेड तहसिलदार संबधीत जागे विषयी लोकप्रतिनिधी यांची मर्जी सांभाळत दोषींवर कारवाई करण्याचे टाळतात.त्याची परिणिती म्हणून या प्रकरणात सहभागी असलेल्या एक व्यक्तीचे अपहरण होते..अपहरण झालेल्या व्यक्तिची पत्नी व इतर महिला नागरिक नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसतात पोलिस अधिक्षक काहीच कारवाई करत असल्याचे दिसून येत नाही. असे का..?

 दहिकळंबा ता कंधार येथील.

दुधकावडे नावाचा उच्चशिक्षित तरुण एका पायाने अपंग असलेला त्याच्या मालकीच्या जागेवर झेंडे रोवले जातात.बिडीओ,तहसिलदार, पोलीस अधिकारी बेकायदेशीरपणे केलेल्या कृत्यावर काहीच कार्यवाही करत नाहीत.हे आश्चर्यकारक आहे.

सोनखेड, अर्धापूर, उस्माननगर,लिंबगाव येथील संबधीत पोलीस अधिकारी यांची पदाचा गैरवापर, आरोपींना मदत करणे,कारवाईस विलंब करणे,निष्पाप व्यक्तींवर गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे नोंदविणे याविषयी कसून चौकशी करून कडक कार्यवाही करावी.

अन्यथा नाईलाजास्तव न्यायासाठी, पद व अधिकाराचा गैरवापर करणार्या पोलीस प्रशासनातील जातीयवादी  अधिकार्यांवर कडक कारवाईसाठी मुंबई मंत्रालयासमोर मोठे आंदोलन करण्यात येईल.


            

No comments:

Post a Comment

Pages