पीएम किसान योजनेच्या लाभासाठी 7 सप्‍टेबर पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक ; नांदेड जिल्ह्यातील 1 लाख 43 हजार 628 लाभार्थ्‍यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया करणे बाकी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 3 September 2022

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी 7 सप्‍टेबर पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक ; नांदेड जिल्ह्यातील 1 लाख 43 हजार 628 लाभार्थ्‍यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया करणे बाकी

नांदेड  दि. 3 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेतील लाभार्थ्‍यांनी सोमवार 12 सप्‍टेबर 2022 रोजी वितरीत होणारा 14 वा हप्‍ता मिळण्‍याकरीता पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी बुधवार 7 सप्‍टेबर 2022 पर्यंत पुर्ण करण्‍याबाबत शासनाने कळविले आहे. 

केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील कालावधीचा लाभ मिळण्‍यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक केली आहे. ज्‍या लाभार्थ्‍यांनी ई-केवायसी केली नाही, अशा लाभार्थ्‍यांचा पुढील लाभ थांबविला जाणार आहे.    

ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया अतिशय सोपी असून ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्‍यासाठी खालील दोन पध्‍दतीने ई-केवायसी करता येईल. लाभार्भी स्‍वतः https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील Farmer Corner या टॅबमध्ये किंवा PMKisan अँपद्वारे ओटीपीद्वारे मोफत करता येईल. (पुढील लिंकद्वारे Direct e-KYC टॅब ओपन होईल - https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx ) ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) येथे प्रति लाभार्थी 15 रुपये दराने ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल. 

नांदेड जिल्‍हयातील 1 लाख 43 हजार 628 लाभार्थ्‍यांनी अद्याप  ई-केवायसी न केल्‍याने योजनेचा पुढील कालावधीचा लाभ थांबविला जाणार आहे.  ई-केवायसी न केलेल्‍यांचा तालुका निहाय  तपशील पुढील प्रमाणे आहे. नांदेड 6 हजार 165, अर्धापूर 4 हजार 464, कंधार 13 हजार 656, लोहा 14 हजार 637, बिलोली 7 हजार 17, नायगाव 9 हजार 422, देगलूर 9 हजार 717, मुखेड 12 हजार 867, भोकर 8 हजार 567, मुदखेड 5 हजार 257, हदगाव 14 हजार 101, हिमायतनगर 6 हजार 243, धर्माबाद 4 हजार 784, उमरी 5 हजार 477, किनवट 15 हजार 723 तर माहूर 5 हजार 521 एवढ्या लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही. 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेतील ज्‍या लाभार्थ्‍यांनी ई-केवायसी अद्याप केलेली नाही, त्‍यांनी  बुधवार 7 सप्‍टेबर 2022 पुर्वी वरील दोन पद्धतीपैकी एका पद्धतीने ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करून योजनेचा पुढील लाभ सुरळीत करून घेण्‍याबाबत जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आवाहन केले आहे.


No comments:

Post a Comment

Pages