मयत कसारे, चव्हाण कुटुंबियांचे अभ्यंकरांनी केले सांत्वन, अधिकाऱ्यांशी चर्चा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 2 September 2022

मयत कसारे, चव्हाण कुटुंबियांचे अभ्यंकरांनी केले सांत्वन, अधिकाऱ्यांशी चर्चा औरंगाबाद, दिनांक 02  :  औरंगाबाद तालुक्यातील पिसादेवी येथील जनार्दन कसारे, खुलताबाद तालुक्यातील खिर्डीचे किरण चव्हाण या मयत व्यक्तींच्या कुटुंबियांना अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी भेटून सांत्वन केले.

 आयोगाचे सदस्य आर.डी. शिंदे, के.आर. मेंढे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त जे.एस.एम. शेख, सहायक आयुक्त पी.जी. वाबळे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, जनार्दन विधाते आदींसह वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.  

 शासनाच्या विविध योजनांचा लाभ मयतांच्या कुटुंबियांना मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही श्री. अभ्यंकर यांनी दिली. तत्पूर्वी सुभेदारी विश्रामगृहात श्री. अभ्यंकर यांनी जिल्हाधिकारी चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलिस अधीक्षक कलवानिया, श्री.शेख, श्री.वाबळे यांच्यासमवेत कसारे, चव्हाण मृत्यूप्रकरणी चर्चा करून योग्य त्या सूचना केल्या. 


No comments:

Post a Comment

Pages