शालेय बसने प्रवास करणा-या विद्यार्थी- विद्यार्थीनीची सुरक्षितेच्या संदर्भात पोलीस अधीक्षक यांची आढावा बैठकीतील सुचना - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 2 September 2022

शालेय बसने प्रवास करणा-या विद्यार्थी- विद्यार्थीनीची सुरक्षितेच्या संदर्भात पोलीस अधीक्षक यांची आढावा बैठकीतील सुचना

 औरंगाबाद  : ग्रामीण जिल्हयातील विविध शाळेतील मुले व मुलींची वाहतुक करणा-या शालेय बस तसेच खाजगी बस मध्ये मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत आज  मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांचे  अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री. संजय मेत्रेवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, श्री. रमेशचंद्र खराडे, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्री. एल. ए. सोफी, उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक), श्री किशोर बतिशे, वाहतुक पर्यवेक्षक,(म.रा.प.म.), श्री. धनराज कांबळे, विस्तार अधिकारी, प.सं. औरंगाबाद, श्री. सिध्दार्थ बनसोडे, उप व्यवस्थापक स्मार्ट सिटी बस, औरंगाबाद यांचे सह विविध शाळेचे मुख्याधापक, शिक्षक, प्रतिनिधी हजर होते.

  यावेळी मा. पोलीस अधीक्षक यांनी शालेय बसने प्रवास करणा-या मुले व मुलींच्या सुरक्षिततेचा विषय विशेष गांर्भियाने घेत जिल्हयाीतील अशा सर्व संबधीत शाळांना मुलांची शालेय बस ने प्रवास करतांना परिवहन विभागाचे नियमांचे काटकोरपणे पालन करण्याबाबत सुचना देऊन पुढील मार्गदर्शक सुचनाचे व्यवस्थापन करण्याबाबत निर्देश दिले यामध्ये स्कुल व्हॅन मध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलांची ने आण होता कामा नये. तसेच शाळेच्या मुख्याधापकांनी याबाबत नियोजन करणे गरजेचे आहे. प्रत्येक व्हॅन मध्ये जी.पी.एस. सुविधेसह सी.सी.टी.व्ही.कॅमेरे असणे अत्यावश्यक आहे. बस वरिल चालक  व वाहक यांचे वेळोवेळी तपासणी करून चारित्र्य पडताळणी करूनच त्यांची नेमणुक करावी. मुलांची चढ-उतार करतांना त्यांच्या देखभाली करिता प्रत्येक बस मध्ये एक महिला अटेंन्डंट ठेवावी. बस मधील आसन व्यवस्था निट व चांगल्या दर्जाची असणे आवश्यक आहे.  शाळेने स्कुल बस समिती पालकांचे माध्यमांतुन स्थापन करावी व या समितीच्या द्वारे वेळोवेळी आढावा घेऊन बस चालक हा मुलांना व मुलींना वेळेत सोडतो अगर कसे, तो व्यसनी अगर विकृत स्वाभावाचा आहे का याबाबत खात्री करावी.  याचप्रमाणे पालकांनी सुध्दा मुलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक जागृत राहुन काळजी घेणे आवश्यक आहे.

 याच प्रमाणे ज्या शाळा मुलांचे स्कुल बस करिता सुरक्षा व वाहतुक नियंमाचे पालन करणार नाहीत त्यांचे स्कुल व्हॅनचे परवाने परिवहन विभागामार्फत तपासणी करून रद्द करण्याचे सुचना सुध्दा यावेळी मा. पोलीस अधीक्षक यांनी दिले आहे.

No comments:

Post a Comment

Pages