कनिष्ठ महाविद्यालय जुक्टा संघटनेच्या किनवटअध्यक्षपदी प्रा.राजीव राठोड , सचिवपदी प्रा.पुरुषोत्तम येरडलावार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 2 September 2022

कनिष्ठ महाविद्यालय जुक्टा संघटनेच्या किनवटअध्यक्षपदी प्रा.राजीव राठोड , सचिवपदी प्रा.पुरुषोत्तम येरडलावार

 किनवट  : तालुका कनिष्ठ महाविद्यालय जुक्टा संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.राजीव राठोड , सचिवपदी प्रा.पुरुषोत्तम येरडलावार , उपाध्यक्षपदी डॉ .वसंत राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.                                   दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी सरस्वती विद्यामंदिर किनवट येथे तालुकास्तरीय कनिष्ठ महाविद्यालय जुक्टा संघटनेची बैठक संपन्न झाला या बैठकीत प्रमुख उपस्थिती म्हणून बळीराम पाटील महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक  विजय खुपसे ,प्रा.अनिल पाटील, प्रा.  रेणुकादास पहुरकर ,मुख्याध्यापक प्रा. घनश्याम राठोड आदींच्या उपस्थितीमध्ये लोकशाही पद्धतीने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली .           अध्यक्ष म्हणून सरस्वती महाविद्यालयाचे प्रा.राजीव राठोड उपाध्यक्ष सरस विद्यालय मांडवी चे डॉ.वसंत राठोड, सचिव बळीराम पाटील महाविद्यालयाचे प्रा. पुरुषोत्तम येरडलावार ,कोषाध्यक्ष बापूजी पाटील, सहसचिव मुळे बी. एम. ,महिला प्रतिनिधी डॉ रत्ना कोमावार, सदस्य प्रा.सुरेश कावळे,प्रा. एकनाथ पोले, निमंत्रित सदस्य म्हणून प्रा. मंगनाले एस. बी .आदि पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाला उच्च विद्या विभूषित विद्यावाचस्पती पदवी प्रदान केलेल्या बळीराम पाटील महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. रत्ना कोमावार ,डॉक्टर  लता पेंडलवाड, सरस विद्यालय मांडवी चे डॉ.वसंत राठोड ,महात्मा फुले विद्यालयाचे डॉ.सोनकांबळे व नुकतेच सेवानिवृत्त झालेले प्रा. चंद्रकांत दमकोंडवार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला  या कार्यक्रमाला प्रा.ज्ञानेश्वर चाटे, प्रा.अपर्णा आरमालकर, प्रा.राधिका तिरमनवार प्रा. साळुंके, प्रा. मुंडे आदींची उपस्थिती होती याप्रसंगी प्रा.विजय खुपसे ,प्रा.अनिल पाटील, प्रा.  रेणुकादास  पहुरकर ,मुख्याध्यापक प्रा. घनश्याम राठोड आदींनी आपले विचार व्यक्त करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Pages