प्रबोधनात सहभागी कलाकारांच्या मुलांना आंबेडकरवादी मिशनमध्ये निशुल्क प्रवेश देऊ - दीपक कदम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 2 September 2022

प्रबोधनात सहभागी कलाकारांच्या मुलांना आंबेडकरवादी मिशनमध्ये निशुल्क प्रवेश देऊ - दीपक कदम

नांदेड ,जयवर्धन भोसीकर (विशेष प्रतिनिधी):

वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यात कलाकार हे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे वाहक आहेत, प्रबोधनाच्या गीतांच्या माध्यमातून ते विचारांची पेरणी सर्वसामान्य पर्यंत करतात. त्यासाठी प्रसंगी अनेक आर्थिक संकटे या कलाकारांच्या कुटुंबावर व स्वतःवर येतात त्यामुळे अशा गरीब व समर्पित कलाकारांच्या मुलांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीची जबाबदारी आंबेडकरवादी मिशन घेईल व त्यांना निशुल्क प्रवेश देईल असे याप्रसंगी उद्घाटकीय संबोधनातून दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी स्पष्ट केले. नांदेड येथे प्राध्यापक मयुरी व अविनाश नाईक यांच्या पुढाकाराने वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित दिमाखदार सोहळ्यात  हा भव्य समारंभ संपन्न झाला. याच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अनंत राऊत प्रमुख उपस्थितीत माजी शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेड , उपप्राचार्य साहेबराव इंगोले ,थोरात सभापती पथारी पप्राचार्य चिंचाणे सर ,संजय उजगिरे सुधीर साळवे ,दैवेशीला गवंदे, डॉ. भास्करराव दवणे ,डॉ.सोनाली कांबळे डॉ.श्रीहरी कांबळे ,  मादळे बीएम उपस्थित होते.

संपूर्ण आयुष्यभर वामनदादा कर्डक यांच्या प्रति समर्पित भावनेने त्यांना सहकार्य करणारे परभणीचे रघुनाथ तलवारे यांना  दुसरा वामनदादा कर्डक जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला ,यापूर्वी पहिला पुरस्कार हा मान. बबन कांबळे यांना 2019 मध्ये प्रदान करण्यात आला होता, covid मुळे दोन वर्षे हा कार्यक्रम रद्द ठेवण्यात आला होता. त्यानंतर  दुसरा पुरस्कार रघुनाथ तलवारे यांना त्यांच्या मनोप्रांत त्यांच्या पत्नीला हा पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात आले.

गाण्यांच्या प्रबोधनासोबतच वैचारिक प्रबोधन सुद्धा अत्यंत आवश्यक आहे व सध्या परिस्थितीत बिलकिस बानू प्रकरण असो किंवा राजस्थान मधील दलित विद्यार्थ्यांना सुवर्णांसाठीच्या पात्रातून पाणी पिल्यामुळे मरेपर्यंत मारण्याचा विषय असो या सर्व घटनेवरून मनुवादी ताकद ही मोठ्या प्रमाणात सक्रिय होताना दिसत आहे त्यामुळे परिवर्तन वाद्यांनी मनुवादी शक्तींचा बीमोड  करण्यासाठी पुढे आला पाहिजे असे डॉक्टर अनंत राऊत यांनी याप्रसंगी विचार मांडले. डॉगोविंद नांदेड यांनी प्रज्ञा सूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या विचारांना कृतिशीलतेचे जोड देण्यावर प्रामुख्याने समाजाने भर द्यावा असे स्पष्ट केले.

याप्रसंगी नुकत्याच ब्रेस्ट कॅन्सर या विषयात पेटंट मिळालेले डॉक्टर भास्कर दवणे व डॉक्टर सोनाली कांबळे यांचा भव्य सत्कार याप्रसंगी करण्यात आला.

मुंबईची गायिका शिल्पा मांडणकर व मयुरी नायक यांनी मिशन ए भीम क्रांतीच्या माध्यमातून वामनदादा कर्डक यांच्या निवडक गीतांचे सादरीकरण याप्रसंगी केले...

कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक अविनाश नाईक यांनी केले.

No comments:

Post a Comment

Pages