प्रभात नगर मध्ये नगरसेवक हरवल्याची चर्चा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 1 September 2022

प्रभात नगर मध्ये नगरसेवक हरवल्याची चर्चा


नांदेड  :
          नांदेड शहराच्या मध्यभागी असलेल्या श्रीनगर लगतच्या प्रभात नगर येथील वॉर्डात पसरलेल्या दुर्गंधीमूळ नागरिक त्रस्त आहेत. नांदेड शहराचे माजी महापौर या भागाचे प्रतिनिधी  असून सुद्धा होत असलेल्या या असुविधेमुळ वॉर्डातील नागरिकांमध्ये नगरसेवक हरवल्याची एकच चर्चा होत आहे.
            शहराचे माजी महापौर मागील पंधरा वर्षांपासून नगरसेवक म्हणून निवडून येत  आहेत. तरी या प्रभागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, ड्रेनेज चे रस्त्याने वाहत असलेले पाणी. या सर्व परिस्थितीमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. असे असताना सुद्धा नगरसेवक साधी चौकशी सुद्धा करण्यास तयार नाहीत. त्यामुळं सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. या नगरास कोणी वाली नाही आमचा नगरसेवक हरवला आहे काय ? अशी चर्चा इथे केली जात आहे. त्यामुळं पालिका प्रशासनाने या बाबीची दखल घेत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करून आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात अशी मागणी नागरिकांमार्फत करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Pages