किनवट तालुक्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचा नीचांक शनिवारी मांडवी व उमरी मंडळात झाली तालुक्यातील सातवी अतिवृष्टी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 7 September 2022

किनवट तालुक्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचा नीचांक शनिवारी मांडवी व उमरी मंडळात झाली तालुक्यातील सातवी अतिवृष्टी

किनवट, दि.07 (प्रतिनिधी) : तालुक्यात जुलैमध्ये तब्बल सहावेळा अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर ऑगस्टमध्ये केवळ 12 दिवस पाऊस पडला. त्यात एकही अतिवृष्टी नव्हती. मात्र सप्टेंबरच्या तीन तारखेला रात्री मुसळधार पाऊस कोसळून, तालक्यातील एकूण नऊपैकी मांडवी व उमरी बाजार या दोन मंडळात प्रत्येकी 74.8 मि.मी.पाऊस पडून अतिवृष्टी झाल्यामुळे तालुक्यातील सातव्या अतिवृष्टीची नोंद झाली.उर्वरीत मंडळात गत चार-पाच दिवसात मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस झाला. तालुक्यातील जून ते सप्टेंबर महिन्यातील पावसाची सरासरी 15 ऑगस्टलाच ओलांडली गेली मात्र जून ते ऑक्टोबरची सरासरी ओलांडायला 4 सप्टेंबर उजाडावे लागले.

   किनवट तालुक्याची ऑगस्ट महिन्यातील 31 दिवसाच्या पावसाची अपेक्षित सरासरी 294.37 मि.मी.आहे. परंतु यंदा ऑगस्टमध्ये तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे  सरासरी केवळ 139.5 मि.मी.पाऊस पडला असून, त्याची टक्केवारी 47.4 आहे. अर्थात तुलनेत सरासरी 52.6 मि.मी. पावसाची तूट आलेली आहे. तालुक्यातील जून ते सप्टेंबर या चार महिन्यातील पावसाची सरासरी 951.90 मि.मी.आहे. 15 ऑगस्टपर्यंत 961.50 मि.मी. (101.01 टक्के )पाऊस पडल्यामुळे ती सरासरी अडीच महिन्यातच ओलांडली गेली आहे. दरम्यान, गत तीन-चार वर्षापासून ऑक्टोबर अखेरपर्यंत मान्सूनचा परतीचा पाऊस रेंगाळत येत धुमाकूळ घालतोय. त्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाची सरासरी मोजणे सुरू झाले आहे. त्यानुसार किनवट तालुक्यातील जून ते ऑक्टाबर या पाच महिन्याच्या पावसाची सरासरी 1026.58 मि.मी.आहे.  या तुलनेत 04 सप्टेंबरच्या नोंदीनुसार 1,047.60 मि.मी.(102.05 टक्के) पाऊस पडल्यामुळे ही सरासरी सुद्धा ओलांडल्या गेली आहे.

  तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून मंगळवार (दि.06) पर्यंतचा पडलेला एकूण पाऊस 9,425.6  मि.मी.असून, त्याची सरासरी 1047.23  मि.मी.येते.  आजघडीला तालुक्यात सर्वाधिक पाऊस इस्लापूर मंडळात झालेला असून, सर्वात कमी उमरी बाजार मंडळात झालेला आहे. तालुक्यात मंगळवार 06 सप्टेंबरपर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस 815.3 मि.मी.असून, या तुलनेत 128.5 टक्के पाऊस पडलेला आहे.  01 जून ते 30 सप्टेंबर या पावसाळ्यातील चार महिन्यादरम्यान पडणार्‍या अपेक्षित पावसाच्या  तुलनेत आतापर्यंत तालुक्यात 110.05 टक्के पाऊस पडलेला आहे.  मागील वर्षी 06 सप्टेंबरपर्यंत पडलेला पाऊस 1,062.60 मि.मी. होता. 30 सप्टेंबर पर्यंतच्या वार्षिक पावसाच्या तुलनेत  त्याची टक्केवारी 130.33 होती.

 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद पुढील प्रमाणे आहे किनवट- 991.1 मि.मी.; बोधडी- 1,102.2 मि.मी.; इस्लापूर- 1,208.7 मि.मी.; जलधरा- 1,133.9 मि.मी.; शिवणी-1,054.4 मि.मी.; मांडवी-1,006.7 मि.मी.;  दहेली- 1,005.8 मि.मी., सिंदगी मोहपूर 961.1 मि.मी.; उमरी बाजार 954.7 मि.मी.

No comments:

Post a Comment

Pages