औरंगाबाद :
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कुल, एन ७ सिडको, औरंगाबाद येथे 'बांधिलकी' सामाजिक जाणिवांचे अभियान अंतर्गत मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
ह्यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त बालाजी सोनटक्के सर,रयत शिक्षण संस्थेचे निवृत्त शिक्षक के.एम.बनकर,अॅड.धनंजय बोरडे,निवृत्त बँक व्यवस्थापक अंबादास रगडे,शिक्षण समन्वयक संजय ठोकळ,मिलिंद बनसोडे ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.
तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यध्यापीका गोरे मॅडम ह्या होत्या ह्यावेळी सहायक पोलिस आयुक्त बालाजी सोनटक्के ह्यांनी आपले जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही,डॉ.बाबासाहेबांनी दिलेल्या शिका,संघटित व्हा,संघर्ष करा ह्या मूलमंत्रात त्यांनी बहुजनांना जगण्याची दिशा दिले तसेच ज्ञानाशिवाय तुमच्या जीवनाचा उत्कर्ष होणे शक्य नाही बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी जीवनातील परिस्थितीशी संघर्ष करण्यासाठी ज्ञान संपादन करून मोक्याच्या जागा काबीज करा तरच तुमचा आणि पुढच्या पिढीचा उद्धार होऊ शकतो असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंजि.अविनाश कांबळे, प्रसेनजीत गायकवाड, आनंद सूर्यवंशी, सचिन गायकवाड, शैलेंद्र म्हस्के,सुमित नावकर,मनीष नरवडे,गुणरत्न सोनवणे,अमोल भालेराव,अनमोल लिहिणार व असोसिएशनचे अध्यक्ष सचिन निकम आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी 50 विद्यार्थ्यांना कंपॉस बॉक्स,ग्राफ बुक,पेन्सिल,रबर,नोटबुक देण्यात आले तर शिक्षणमहर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान च्या वतीने रंगपेटी व पेन विद्यार्थ्यांना देण्यात आले.
तर गणिताशी संबंधित प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना अंबादास रगडे ह्यांनी रोख पारितोषिक दिले.
शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ह्यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment