नांदेड दि. 26 :- जिल्ह्यातील उद्योजकांसाठी निर्यात गुंतवणुक वृध्दी कार्यक्रम निर्यात प्रचलन तसेच एक जिल्हा एक उत्पादन या विषयावर दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळा गुरुवार 29 सप्टेंबर व प्रदर्शन गुरुवार 29 व शुक्रवार 30 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते 5 या कालावधीत जिल्हा उद्योग केंद्र (उद्योग भवन), औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, नांदेड येथे होईल. जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी या कार्यशाळा व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.
निर्यातदार उद्योग घटकांना लागणाऱ्या आवश्यक बाबी जसे विविध परवानग्या नोंदणी व विविध योजना या बाबींची माहिती देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी डीजीएफटी (DGFT) व एपीइडीए (APEDA) या संस्थेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच निर्यात संबंधी येणाऱ्या अडचणी, तसेच उद्योग विभागाचे सहकार्याने उद्योग सुरु केलेल्या उद्योजकांचे उत्पादनांचे प्रदर्शन या ठिकाणी असणार आहे, असेही जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने कळविले आहे.
No comments:
Post a Comment