सुनील अवचार यांचा “पँथर जीवे छे !” अनुवादित कवितासंग्रह प्रकाशित - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 26 September 2022

सुनील अवचार यांचा “पँथर जीवे छे !” अनुवादित कवितासंग्रह प्रकाशित


अहमदाबाद : नुकताच ‘गुजराती दलित साहित्य अकादमी’ अहमदाबाद यांनी प्रा. सुनील अभिमान अवचार यांचा गुजराती अनुवादित कवितासंग्रह “पँथर जीवे छे !” प्रकाशित केला. गुजरात विद्यापीठ, हिरक मोहोत्सव हॉल,अहमदाबाद (गुजरात)येथे एक दिवशीय राष्ट्रीय सेमिनारमध्ये हा प्रकाशन सोहळा पँथर ज वि पवार, प्रकाश शाह (गुजराती साहित्य परिषद प्रमुख), साहित्यकार केशुभाई देसाई, प्रवीण गढवी, हरिश मंगलम इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पळला. मूळ कविता मराठी भाषेत लिहिली असून तिचा गुजराती अनुवाद डॉ. रतीलाल रोहित यांनी केला आहे.

दलित पँथरचे सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्ताने सुनील अवचार यांची दीर्घ कविता “काळोखावरची टोळधाड” मुंबईच्या ललित पब्लिकेशन यांनी प्रकाशित केली आहे. ज वि पवार,अर्जुन डांगळे यांची प्रस्तावना लिहिली असून हरीश मंगल यांनी मलपृष्ठा वर मजकूर लिहिला आहे. तर गुजराती बरोबर ही कविता हिंदी भाषेमध्ये सुद्धा प्रकाशित झाली असून इंग्रजीमध्ये पुढील आठवड्यात तिचे प्रकाशन होणार आहे.


संग्रहाच्या प्रकाशनावेळी सुनील अवचार यांच्याशी बातचीत केली असता “पँथर चळवळीचे गुजरातशी घट्ट सांस्कृतिक नात आहे, पँथर च्या सुवर्ण महोत्सवी वर्षात कवितेची मराठी ते गुजराती भाषेतील ही समृद्ध देवाण घेवाण मोलाची आहे.” असे मत त्यांनी व्यक्त केले. 

No comments:

Post a Comment

Pages