पत्रकार सिध्दार्थ कांबळे युवा पत्रकार पुरस्काराने सन्मान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 25 September 2022

पत्रकार सिध्दार्थ कांबळे युवा पत्रकार पुरस्काराने सन्मान

कुंडलवाडी ,जयवर्धन भोसीकर :

बिलोली तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रातून सर्वसामान्यांचे प्रश्न व त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून सतत कार्यशील असलेले पत्रकार सिध्दार्थ कांबळे,कुंडलवाडीकर यांना या उत्कृष्ट कार्याबद्दल दैनिक युवाराज्य परिवाराकडून युवा पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

  दैनिक युवाराज्य परिवाराकडून व आजाद फाउंडेशन संचलित आझाद ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रविवार रोजी नांदेड नमस्कार चौक येथील गणराज पॅलेस येथे युवा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक आजाद ग्रुपचे अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे, प्रमुख पाहुणे म्हणून मा.तहसीलदार स्वामी आझाद ग्रुपचे उपाध्यक्ष प्रमोद टाले,कोनाले कोचिंग क्लासेसचे संचालक योगेश कोनाले,दैनिक युवाराज्याचे संपादक अजित पाटील,आवृत्ती प्रमुख प्रा.गणेश पाटील शिंदे या  मान्यवरांची प्रमुख उपस्थितीत होती. 

बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले पत्रकार सिध्दार्थ कांबळे,कुंडलवाडीकर हे अनेक सामाजिक कार्यात आपला सहभाग घेतात त्यांनी आपल्या वृत्तपत्रातून तळागाळातील सर्व सामान्य माणसांना प्रसिद्धी देऊन न्याय मिळवून दिले असल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन दैनिक युवाराज्य परिवाराकडून दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रविवार रोजी नांदेड नमस्कार चौक येथील गणराज पॅलेस येथे युवा पत्रकार पुरस्कार आजाद ग्रुपचे अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे  यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

बिलोली तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न व त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून सतत कार्यशील असलेले व फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा नेटाने पुढे नेण्यासाठी सातत्याने काम करीत असल्यामुळे त्यांना जिल्हाभरात मानाचे स्थान दिले जाते युवा पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Pages